बेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन
Category:
अवर्गिकृतसरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ‘ ‘ तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ?’ या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..हात थोडे थरथरत होते तरीही नेटाने लिहीत गेलो .. या पूर्वी मी शाळेत आणि इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हंटल्या होत्या व त्या सगळ्यांन मध्ये देवाला काही ना काही मागितलेले असायचे व बहुधा धन .धान्य समृद्धी ..पुत्र ..सुख अश्या गोष्टी त्यात असत .या प्रार्थनेत मात्र देवाकडे फक्त सहनशक्ती ..धैर्य ..आणि समजूतदारपणा मागितला होता हे जरा विशेष होते
January 22, 2020