कथा

उगाच काहीतरी -२६

Category:

 

12 जुलै 2022 ला नासाच्या JWST ( James Webb Space Telescope) ने पाठवलेल्या छायाचित्रांचा पहिला लॉट बेस स्टेशन ला प्राप्त झाला आणि सगळ्यांमध्ये उत्साह पसरला. आलेल्या छायाचित्रांची छाननी करताना एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि बेस स्टेशनवर एकच खळबळ माजली. त्या फोटोत करोड़ों प्रकाशवर्ष दुर आजवर कधीही नजरेत न आलेला एक अतिशय प्रखर चमकदार प्रकाश दिसत होता. सगळे आश्चर्यचकित झाले की आजवर हा प्रकाश कसा लक्षात नाही आला?
लेखसंग्रह

केळ्यांतली गुंतागुंत

Category:

 

केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अ‍ॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे.

लेखसंग्रह

बर्फाखालची नदी

Category:

 

अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत.

कथा

उगाच काहीतरी -२४

Category:

 

काल मी मरता मरता वाचलो.
त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे.
2-3 ठिकाणी पाहिले पण काही मिळाली नाही. शेवटी कॉंप्लेक्सच्या गेट वरच्या स्टेशनरीवाल्याने उद्या आणुन ठेवतो संध्याकाळी घरी जाताना घेऊन जा म्हणून सांगितले.
कथा

कॅफे डेस्टिनी

Category:

 

एका मॅट्रिमोनिअल साईटवर दोन दिवस चॅटिंग केल्यानंतर निकिता आणि निखिल दोघे रविवारी संध्याकाळी हॉटेल कॅफे डेस्टिनीला भेटायचे ठरवतात. ठरल्याप्रमाणे निखिल निकिताला भेटण्यासाठी त्याचा मित्र निहारला सोबत घेऊन आणि निकिता तिची मैत्रीण नेहाला सोबत घेऊन येते. चौघांचे हाय – हॅलो झाल्यावर निखिल आणि निकिता हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर एकमेकांशी बोलण्यासाठी जातात आणि निहार आणि निकिता तिथेच एका टेबलवर बसून कॉफी ऑर्डर करतात.

लेखसंग्रह

द्विपाद पूर्वज

Category:

 

आजचा माणूस सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आला. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दोन पायांवर चालू शकत होता. पण तेव्हा माणूस हाच फक्त काही द्विपाद प्राणी नव्हता. माणूस जन्माला येण्याच्या सुमारे एक लाख वर्षं अगोदर जन्माला आलेल्या निअँडरटालसारखे, माणसाचे इतर भाऊबंदसुद्धा दोन पायांवर चालू शकत होते. इतकंच काय, पण त्या अगोदर चाळीस लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकससारख्या मानवपूर्व प्रजातीही द्विपाद होत्या. माणसाच्या पूर्वजांचं हे ‘दोन पायांवर चालणं’, हा मानवी उत्क्रांतीतला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच उत्क्रांतीशास्त्रात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे – ‘सर्वात प्रथम दोन पायांवर चालणारा माणसाचा पूर्वज कोणता?’. अलीकडेच केल्या गेलेल्या एक नव्या संशोधनानं याबद्दलच्या माहितीत भर टाकली आहे. फ्रान्समधील प्वाट्ये विद्यापीठातील फ्रँक गाय आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलेलं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

कथा

परिस्थिती

Category:

 

आज पाच वर्षांनी ती पुन्हा त्याला बसस्टॉपवर दिसली. गळ्यातील मंगळसूत्रावरून कळत होतं की तिचं लग्न झालंय. पाच वर्षानंतरसुद्धा ती तितकीच सुंदर दिसत होती. तिच्याशी बोलण्यासाठी तो तिच्याजवळ जातो आणि तिला विचारतो, “ओळखलंस?” त्याला पाहताच तिचे मन पुन्हा पाच वर्ष मागे जाते. काही वेळ तसंच त्याला बघितल्यानंतर ती म्हणते, “हो, न ओळखायला काय झालं” तिचे हे उत्तर ऐकून तो तिला म्हणतो, “पण त्यावेळेस मी तुला ओळखण्यात चूक केली प्रतीक्षा . मला वाटलं नव्हतं की तू मला प्रेमाची स्वप्नं दाखवून दुसऱ्याच मुलाबरोबर पळून जाऊन सुखाचा संसार थाटशील. काय कमी होती माझ्यात? का माझ्या प्रेमाचा असा अपमान केलास? मी असं काय चुकीचं वागलो होतो प्रतीक्षा, ज्याची तू मला इतकी मोठी शिक्षा दिलीस?

लेखसंग्रह

CRIC कथा : मराठीतील एकमेव क्रिकेट दिवाळी अंक

Category:

 

CRIC कथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.