आपणच आपला आरसा झालो
की आयुष्य सोपं होतं,
परक्यांच्या नजरेत आपलं
प्रतिबिंब शोधणं थांबतं.
चुकांची कबुली देताना
लाज वाटेनाशी होते,
स्वतःशी प्रामाणिक राहिलं
की वाट आपोआप सापडते.
नकळत घातलेले मुखवटे
हळूहळू गळून पडतात,
खऱ्या चेहऱ्याशी ओळख झाली
की भीतीही दूर जाते.
स्वतःकडे पाहण्याचं धाडस
जेव्हा मनात येतं,
तेव्हाच कळतं,
आपणच आपला आरसा झालं
की आयुष्य खरंच सोपं होतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Author
Post Views: 8