अपेक्षेप्रमाणे गोष्टी का घडत नाहीत? – एक विचार

‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.



‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.

माझ्या मते अशी परिस्थिती [ अपेक्षित परिणाम आणि प्रत्यक्ष परिणाम यांच्यात फार तफावत असणे ] असे होण्याची प्रामुख्याने फक्त चार कारणे असतात –
अ] उत्पादन ग्राहकाच्या अपेक्षे प्रमाणे नसणे अथवा डिझाईन केलेल्या स्पेसिफिकेशन्स प्रमाणे न तयार होणे.
ब] उत्पादन सांगितलेल्या / अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा तयार होणे.
क] उत्पादन निर्माण करण्यास लागणारा वेळ अपेक्षेपेक्षा जास्त असणे [ through put time ].
ड] उत्पादन खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होणे.

या सर्व वाईट परिणामांची मूळ कारणे [root causes] अथवा स्त्रोत खालील प्रमाणे असतात –
१] व्यवस्थापनाची संस्कृती – रूढ पद्धती, मुल्ये, दूरदृष्टी, कामाची शिस्त.
२] धोरणे – व्यवस्थापनाचे गांभीर्य, सातत्य, स्पष्टता, लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता, संवाद क्षमता [ कम्युनिकेशन ].
३] रोजच्या कामाच्या व्यवस्थापनाची पद्धत – अंतर्गत रचना, प्रक्रिया करण्याची पद्धत, काम मोजण्याची पद्धत, जटील नियम, अपुरे संसाधन, सुधारणा घडवून आणण्याच्या तंत्रांबद्दल अज्ञान.
४] कर्मचारी गण – अयोग्य काम, अपुरे ज्ञान अथवा क्षमता, कामातील स्पष्टता, परस्परांतील संवाद, सक्षमीकरण, सांस्कृतिक उदारता.

संपूर्ण टीमच्या मदतीने वरील समस्यांचे विश्लेषण अगदी सहजपणे करता येते. सर्वांची हुशारी एकत्रितपणे वापरली [brain-storming] की बहुतेक वेळा मूळ कारणाची उकल जास्त सहजपणे करता येऊन, त्या समस्येच्या मूळ कारणापर्यंत पोहोचता येते. तसेच वैयक्तिक मते अथवा समज यामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. विश्लेषणासाठी भरपूर क्वालिटी तंत्रे उपलब्ध आहेत. वैयक्तिक मते अथवा समज यांच्या प्रभावाखाली, दुर्दैवाने क्वालिटी तंत्रांचा उपयोग फार कमी केला जातो. एकदा मूळ कारण समजले की त्यावरील उपाय फारसे अवघड नसतात.
इंग्रजी मध्ये एक म्हण आहे “Culture eats strategy for breakfast!” म्हणजेच जर समस्या कामाच्या संस्कृतीशी निगडीत असेल तर बरीचशी धोरणे परिणामकारक ठरत नाहीत. अशा वेळी कंपनीच्या संस्कृतीमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणण्याची गरज असते.
जर कामासंबंधी माहिती स्पष्टपणे आणि विश्वासार्हपणे पुरविली नसेल तर लोक आज्ञा नीट पाळू शकत नाहीत. कामाची परिमाणे बरोबर नसतील तरीही लोकांच्या कामावर वाईट परिणाम होतो.
ज्ञानाला पर्याय नाही. जर योग्य आणि पुरेसे प्रशिक्षण मिळाले नसेल तर लोकांच्या हातून चुका होणार अथवा त्यांचे निर्णय चुकीचे होऊ शकतात.
उत्पादन विभागात होणाऱ्या चुकांचे मूळ कारण बहुदा बाजूच्या विभागातील चुका हे असते. कामाच्या जागेवरील वातावरण अयोग्य असल्यास कामावर अनिष्ट परिणाम होतो.
कंपनीच्या मूल्यांशी तडजोड होत असल्यास, काम करणाऱ्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन त्याचा दुष्परिणाम हळूहळू कंपनीच्या कामगिरीवर दिसू लागतो.
ही झाली काही ढोबळ उदाहरणे. यासाठीच समस्येचे व्यवस्थित विश्लेषण, त्यानंतर उपायांची शिस्तबद्ध अंमलबजावणी आवश्यक असते. ही शिस्त जर व्यवस्थित पाळली तर पुनः पुनः, त्याच त्याच येणाऱ्या समस्यांमुळे वाया जाणारा वेळ आणि होणारा मनस्तापाचा भोग खूपच कमी होतो.
खरेतर अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे फारसे अवघड नाही. बघा पटतय का?

कुठलीही भिंत पडण्याआधी ती सुरुवातीला बांधली का होती याच्यावर पूर्ण सखोल विचार करा ! – एक चीनी म्हण

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author