विचारसरणीतला स्पष्टपणा

एके दिवशी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होतो. चर्चेचा विषय होता वय आणि मानसिक परिपक्वता किंवा विचारांचा स्पष्टपणा यातील परस्पर संबंध. माझे मन एकदम भूतकाळात गेले आणि एका घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. तेव्हा मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत, डिझाईन इंजिनीअर, हे पद सांभाळत होतो. मी इतरांना म्हणालो, “अनुभवातून माझ्या मनाला एक गोष्ट पटली आहे की वय आणि मनातील विचारांची स्पष्टता याचा परस्पराशी फार जवळचा संबंध असत नाही.”



एके दिवशी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होतो. चर्चेचा विषय होता वय आणि मानसिक परिपक्वता किंवा विचारांचा स्पष्टपणा यातील परस्पर संबंध. माझे मन एकदम भूतकाळात गेले आणि एका घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. तेव्हा मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत, डिझाईन इंजिनीअर, हे पद सांभाळत होतो. मी इतरांना म्हणालो, “अनुभवातून माझ्या मनाला एक गोष्ट पटली आहे की वय आणि मनातील विचारांची स्पष्टता याचा परस्पराशी फार जवळचा संबंध असत नाही.”

आमच्या कंपनीच्या पुण्यातील उत्पादन विभागाच्या जवळच ‘स्वागत कक्ष’ आहे. तिथे रीसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्यासाठी स्वतंत्र टेबल आहे. तिथून जवळच भेटीस येणाऱ्या व्हीझीटर लोकांसाठी बसण्यास सुलभ अशा सोफा चेअर्स आहेत. तसेच खिडकीजवळ पाणी पिण्यासाठी कुलर सुद्धा बसवला आहे. पाणी पिण्यासाठी दिवसभरात वेळोवेळी कंपनीचे त्या मजल्यावरचे कर्मचारी येत असतात. त्यांचा उद्देश पाणी पिणे हा तर असेच पण त्या ठिकाणी दुसरे कर्मचारी असतील तर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून रील्याक्स होणे हाही असे.

एके दिवशी सकाळी सकाळीच मी कुलरपाशी पाणी पीत होतो. त्यावेळी तिथे बसलेल्या एका तरुण मुलाकडे माझे लक्ष गेले. तो व्यवस्थित कपडे घातलेला आणि भांग पाडलेला पंचवीस एक वयाचा तरुण होता. तो नोकरीच्या मुलाखतीसाठी आलेला असावा असे मला वाटले. साधारण दीड तासाने मी परत कुलर पाशी गेलो तेव्हाही तो तसाच खुर्चीवर बसलेला होता. वेळ सकाळी साडे अकराची होती. मी सहज त्याची चौकशी केली, आपण येथे मुलाखतीसाठी आला आहात का? तो उत्तरादखल बोलला, “हाय, शुभ प्रभात, माझे नाव रामन. तुमच्या कंपनीत असलेल्या (Human resources, HR) ह्या विभागाने मला मुलाखतीस बोलावले आहे. मुलाखतीची वेळ सकाळी १० ची होती. पण मी मुंबईवरून आल्याने काहीसा वेळेपेक्षा आधी आलो.

काहीतरी चुकले आहे, काहीतरी गडबड आहे अशी संवेदना माझ्या मनास झाली. मुलाखत १० वाजता होती आणि तो गरीब मुलगा साडेअकरा वाजून गेले तरी अजूनही थांबलेला होता. काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलाला बोललो, “संबंधित व्यवस्थापक काहीतरी तातडीच्या कामात अजून अडकले असतील. मी समजतो की तुम्ही रीसेप्शनिस्टला कल्पना दिली असेलच.” तो तरुण म्हणाला “होय, त्यांनी मला थांबायला सांगितले आहे.” माझ्या कामाकडे परत जाताना मी हसत हसत त्याला मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. नंतर कामाच्या नादात त्याच्याशी झालेला हा संवाद माझ्या डोक्यातून निघून गेला.

जेवणानंतर दुपारी मी पाणी प्यायला कुलर पाशी गेलो तर दिसले की तोच मुलगा आपल्या विचारात गढलेला तेथेच बसून होता. उत्सुकतेने मी त्याला विचारले की त्याने दुपारचे जेवण घेतले का, तर असे कळले की त्याच्या जेवणाची व्यवस्था कोणीच केली नव्हती. जेवणाची वेळ तोपर्यंत संपलेलीच होती, त्यामुळे माझाही नाईलाज झाला.

संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास, प्लांट मॅनेजरने सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. त्या बैठकीत त्याने एक पत्र, जे त्या मुलाखतीला आलेल्या उमेदवाराने लिहिले होते, ते वाचून दाखवले. त्यातला मजकून असा होता. “ आदरणीय सर, मी तुमच्या प्रतिष्ठित कंपनीत काही स्वप्ने उराशी बाळगून, आज सकाळी आलो होतो. माझे कोणी स्वागत-चौकशी केली नाही. माझी मुलाखत सकाळी १० वाजता आयोजित केली होती. मला नाममात्र सांगण्यात आले की व्यवस्थापक कामाच्या गडबडीत आहेत. मी कंपनीच्या भोजनाच्या आणि दुपारी चहाच्या वेळेपर्यंत थांबलो होतो. दुपारी पुन्हा मला तेच सांगण्यात आले की व्यवस्थापक व्यग्र आहेत आणि मी आणखी काही वेळ थांबावे. दरम्यानच्या काळात मी दोन वेळा कुलरचे पाणी मात्र प्यायलो. आता सव्वाचार वाजले आहेत आणि आपल्या रीसेप्शनिस्टकडे हे पत्र देऊन आपल्या आवारातून बाहेर पडत आहे. रीसेप्शनिस्टना ते पत्र पुढे अधिकाऱ्यांना द्यावे असे विनंती करून सांगितले आहे. त्याप्रमाणे पत्राची कार्यवाही त्या करतील असे मी समजतो. खेदपूर्वक पुढे आपणास कळवू इच्छितो की यापुढे आपल्या कंपनीत काम करण्याची माझी इच्छा नाही, समजा आपण माझी निवड केलीत तरी माझा निर्णय कायम असेल. आपल्याला शुभेच्छा, – श्री रमण ”

प्लांट मॅनेजरने पत्र वाचून झाल्यावर आपले बोलणे चालू ठेवत मत व्यक्त केले की- आपल्या कर्मचारी वर्गात या उमेदवाराला समाविष्ट करणे मला नक्कीच आवडले असते, त्याने आपल्या सर्वांनाच जाता जाता धडा शिकविला आहे.
मित्रानो या तरुण वयातही ह्या उमेदवाराने विचारांची जी प्रगल्भता दाखवली आहे त्यामुळे मला खात्री वाटते तो जिथे जाईल तेथे त्याच्या हातून काहीतरी मोठे काम घडेल.

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. देव मनाला आधार देईल पण प्रयत्न तुलाच करायचे आहेत.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author