मी नाटकाचे पार्श्वसंगीत करतो

त्याचवेळी विजय तेंडुलकर लिखित ‘एक हट्टी मुलगी’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे ठरले. निर्माते मोहन तोंडवळकर, संस्था ‘कलावैभव’. नाटकाचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे. प्रमुख भूमिकेत विनोदी अभिनेते म्हणून गाजलेले शरद तळवलकर. भेंडेंना पार्श्वसंगीताची जबाबदारी नंदू भेंडे या त्यांच्या मुलाकडे द्यायचं मनात होतं. परंतु जयंत सावरकरांच्या प्रयत्नांमुळे ते काम करण्याची संधी मला मिळली. अर्थात मला त्या कामाचा अनुभव नव्हता. प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत वापरतात एवढंच ठाऊक होतं. देवाचं नाव घेऊन सुरुवात केली. नाटकाच्या तालमी पाहताना आवश्यक तेवढ्या जागा निश्चित केल्या. मध्यांतराआधीच्या प्रसंगानुरूप मिश्र शिवरंजनीचा एक पीस कंपोझ केला. त्यात सतारीची आवश्यकता होती. के. के. जीजीना ( तबलजी आबान मिस्त्री यांचे गुरू) यांनी ते करायचं कबूल केलं. त्याचं रेकॉर्डिंग झालं आमच्या फॅमिली डॉक्टर सुंदरताई गावस्कर – केंकरे (प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची आत्या ) यांच्या घरी. रात्री दहानंतर हे रेकॉर्डिंग केलं होतं. इतर वादक कोण होते ते आठवत नाही. पण जीजीना साहेबांनी ‘आपने ये पीस बहुत खूबसुरत कंपोझ किया है। इसे मै मेरे प्रोग्रॅम में इस्तेमाल करूंगा,’ अशी दाद दिली.

नाटकाच्या सुरुवातीला कथानकाला पोषक असा श्लोक निवडून त्याचंही रेकॉर्डिंग केलं होतं. भेंडे साहेबांना ऐकवलं. पण त्यांचं म्हणणं पडलं की ‘या कुन्देन्दुतुषारहार धंवला’ हा श्लोक घ्यावा. अर्थात त्यावेळी मी नवीन असल्यामुळे दिग्दर्शकाची आज्ञा पाळणं भाग होतं.

नाटकाची रंगीत तालीम पोद्दार कॉलेजच्या हॉलमध्ये होती. स्टेजपासून काही अंतरावर मी पार्श्वसंगीत संयोजकाबरोबर बसलो होतो. थोड्या वेळाने तेंडुलकर आले आणि माझ्या शेजारी तालीम पहायला बसले. तालीम सुरू झाली.

कोऽहं सोऽहम्/ ४५

शरदरावांचे त्यावेळी इतर नाटकांचेही प्रयोग आणि दौरे असल्यामुळे नाटकाच्या नकलेवर हवा तसा त्यांचा ताबा नव्हता. त्यामुळे चुकत माकत तालीम चालू होती. तेंडुलकर मिस्किलपणे म्हणाले, “शऱ्याला आता कळेल की नाटक कालेलकरांचं नाही तेंडुलकरांचं आहे.

प्रयोग २१ नोव्हेंबर १९६६ रोजी साहित्य संघात झाला. प्रयोगाच्या वेळी मात्र तळवलकरांनी नकलेवर बऱ्यापैकी ताबा मिळवला होता. नायिकेच्या भूमिकेत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री कामिनी कदम होत्या. नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत ‘स्मिता’ या नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. काळ्यासावळ्या पण देखण्या अशा या अभिनेत्रीने सुनेच्या भूमिकेत आपली छाप पाडली.

-पण का कोण जाणे, तेंडुलकरांचं नाटक, दिग्दर्शक आत्माराम भेंडे आणि प्रमुख भूमिकेत शरद तळवलकर हे समीकरण काही जमलं नाही. त्यामुळे थोड्या फार प्रयोगांनंतर हे नाटक बंद पडलं. नाटकावर बरीवाईट परीक्षणंही आली. पण पार्श्वसंगीताबद्दल काहीच छापून आलं नाही. बरंही नाही वाईटही नाही. अनुल्लेखाने त्याची बोळवण झाली. नाटकाच्या छापील प्रतीत देखील दिग्दर्शक आत्माराम भेंडे, नेपथ्य – रघुवीर तळाशीलकर व कलाकारांची नावं आहेत. तेंडुलकर पार्श्वसंगीताचा उल्लेख करायला विसरले असावेत किंवा त्यांना ते तेवढं महत्त्वाचं वाटलं नसावं.

हे पार्श्वसंगीत करण्याबद्दल मानधन वगैरे काही नव्हतं. माझी तशी अपेक्षाही नव्हती. तेंडुलकरांच्या नाटकाचं पार्श्वसंगीत करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासारख्या नवख्याच्या दृष्टीनं अभिमानाचं होतं. निर्माता मोहन तोंडवळकर याने मात्र जाहिरातीत माझं नाव आवर्जून घातलं होतं. हेही नसे थोडके! एकीकडे नोकरी एके नोकरी चालू होती.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →