श्रावणसरी

बरसल्या श्रावण सरी
रोम रोम हर्षितो..
पिसारा फुलवूनी
मयूर आनंदे नाचतो..

बरसल्या श्रावण सरी
वेलींना आला बहर..
सजली धजली धरा
हिरवाईचा डोईवर पदर...

बरसल्या श्रावण सरी
फांद्यावरती झुलती झुले..
माहेरच्या आठवणींची सर
पाणावती डोळे ओले...

बरसल्या श्रावण सरी
गोपाळकाला कृष्णा करी..
यशोधरा शोधत राही
विश्वाचा पालनहरी..

बरसल्या श्रावण सरी
उन पाऊस खेळ अंगणी..
रिमझिम उडवित तुषार
आला इंद्रधनु रंगूनी..



बरसल्या श्रावण सरी
रोम रोम हर्षितो..
पिसारा फुलवूनी
मयूर आनंदे नाचतो..

बरसल्या श्रावण सरी
वेलींना आला बहर..
सजली धजली धरा
हिरवाईचा डोईवर पदर…

बरसल्या श्रावण सरी
फांद्यावरती झुलती झुले..
माहेरच्या आठवणींची सर
पाणावती डोळे ओले…

बरसल्या श्रावण सरी
गोपाळकाला कृष्णा करी..
यशोधरा शोधत राही
विश्वाचा पालनहरी..

बरसल्या श्रावण सरी
उन पाऊस खेळ अंगणी..
रिमझिम उडवित तुषार
आला इंद्रधनु रंगूनी..

Author