आई तुळजा भवानी

आद्यशक्ती रूप! तुळजा भवानी!!
विश्वाची जननी! जगदंबा!!१!!

नवरात्री पूजा! असे शक्ती स्थान!
भाविकांना मान! जागराचा!!२!!

उदो उदो आई! जयजयकार!
करावा जागर !तुझ्या ठायी!!३!!

व्रत तपस्विनी! प्रकटे त्वरिता!
कल्याणाकरीता! भक्तांसाठी!!४!!

कुळाचा उद्धार! दिली दिव्य शक्ती!
शिवराय भक्ती! फळा आली !!५!!

अखंड तेवतो! दीप तेजस्विनी!
आरूढ स्वामिनी! हत्ती वरी !!६!

तुझा आशीर्वाद! लाभो कृपाछत्र!
महिमा सर्वत्र ! तुझा आई!!७!!

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/



आद्यशक्ती रूप! तुळजा भवानी!!
विश्वाची जननी! जगदंबा!!१!!

नवरात्री पूजा! असे शक्ती स्थान!
भाविकांना मान! जागराचा!!२!!

उदो उदो आई! जयजयकार!
करावा जागर !तुझ्या ठायी!!३!!

व्रत तपस्विनी! प्रकटे त्वरिता!
कल्याणाकरीता! भक्तांसाठी!!४!!

कुळाचा उद्धार! दिली दिव्य शक्ती!
शिवराय भक्ती! फळा आली !!५!!

अखंड तेवतो! दीप तेजस्विनी!
आरूढ स्वामिनी! हत्ती वरी !!६!

तुझा आशीर्वाद! लाभो कृपाछत्र!
महिमा सर्वत्र ! तुझा आई!!७!!

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Author