सावळा विठ्ठल

सावळा विठ्ठल! कर कटावरी!
भेटला पंढरी! भक्ती भावें!!१!!

पाहून श्रीमुख! वारकरी डोले!
पांडुरंग बोले! वाणी सदा!!२!!

हरी नाम घेता! सुख लागे जीवा!
नयनी पहावा! विश्वंभर!!३!!

तुळशीची माळ! शोभिवंत गळा!
विश्वाचा सोहळा! तुझ्या ठायी!!४!!

उभा विटेवरी! माझा पांडुरंग!
मन होई दंग! पाहताच!!५!!

आत्म्याचे रिंगण! भक्तीने योजावे!
होऊंन पहावे! वारकरी!!६!!

टाळ मृदंगाचा! ताल धरताना!!
माळ जपताना! मनोभावे!!७!!

विठ्ठला विठ्ठल! तुझी आळवणी!
घ्यावे सांभाळूनी! भोळे भक्त!!८!!

माझ्या अंतरीचे! दोष निवारण!
घडो पारायण! पांडुरंगा!!९!!

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/



सावळा विठ्ठल! कर कटावरी!
भेटला पंढरी! भक्ती भावें!!१!!

पाहून श्रीमुख! वारकरी डोले!
पांडुरंग बोले! वाणी सदा!!२!!

हरी नाम घेता! सुख लागे जीवा!
नयनी पहावा! विश्वंभर!!३!!

तुळशीची माळ! शोभिवंत गळा!
विश्वाचा सोहळा! तुझ्या ठायी!!४!!

उभा विटेवरी! माझा पांडुरंग!
मन होई दंग! पाहताच!!५!!

आत्म्याचे रिंगण! भक्तीने योजावे!
होऊंन पहावे! वारकरी!!६!!

टाळ मृदंगाचा! ताल धरताना!!
माळ जपताना! मनोभावे!!७!!

विठ्ठला विठ्ठल! तुझी आळवणी!
घ्यावे सांभाळूनी! भोळे भक्त!!८!!

माझ्या अंतरीचे! दोष निवारण!
घडो पारायण! पांडुरंगा!!९!!

प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-

https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

Author