इंद्रधनू आले अंगणात
अंगणात फुलली तुळस..
इंद्रायणी काठी सजलेला
सजलेला सोनेरी कळस ..
तुकोबांच्या तरलेल्या गाथा
गाथा संत वाणी बहुमोल..
ज्ञानेश्वरी वेद पारायण
पारायण सुख अनमोल..
माळ तुळशीची गुंफलेली
गुंफलेली नामजप माला..
ओवाळू भावार्थे पांडुरंग
पांडुरंग मनात वसला..
उरावे फक्त विठ्ठल ध्यान
ध्यान सावळा ठेवेल माझे
देवा विठ्ठला भेटाया आलो
आलो वरदान घेण्या तुझे
Author
Post Views: 6