निरोप (मुक्तछंद काव्य)

निरोप दिलाच आहेस
आसवांची गर्दी उगाच कशाला..
एकटेपणाचा प्रवास कायमच वाट्याला
एक एक माळेतील मोती ओघळतो
सवय असावी लागते ....
गुंतलेले मन हळवे कातर ..
त्यातही उबदार मायेची शाल
पांघरूण घ्यावी अशी सोय नाही..
कोणाला नको असते वाळवंटात पाणी
अश्रूधारांनी वाहतात का झरे..
मिटवून टाकतात का मनातील अंतरे...
खोल रूतून राहतेच मनात सल
निरोपाच्या भावुक क्षणानंतर...

अस्तित्वच शून्य तुझे माझे
देहां मधून वाहत जाते फक्त..
बदल तर कणाकणातून घडतो आहे
पानं, फूल,वारा,पाऊस, निसर्ग..
आणि व्यापलेला ज्ञात अज्ञात प्रत्येक
जण निरोप घेताना बदलत असतो..

निरोप घेताना फक्त एकच करावं
जाणाऱ्यांना दूरूनच पहावं..
सुकलेल्या फुलांना मधूनच हुंगत जावं..
मिटलेल्या पापण्यात हृदयाच्या तळ्यात
साचवत राहू नये ते निरोपाचे हुंदके..
ते हुंदक्यांचे सूर असूर बनून राहतील
तुमच्या जीवनात...

निरोप रामाने सितेला..कृष्णाने राधेला..
द्रोणाचार्यांने अश्वत्थाम्यास दिला...
अमरत्व प्राप्त झाले असूनही निरोपाच्या
प्रतिक्षेत अश्वत्थामा भटकतो..
चिरकाल तारुण्यात राहणारा
ययाती ही जळतो...
कृष्ण सखा राधेच्या श्वासात
आनंद बनून वाहतो..
निरोपाची सांगता करताना
पुन्हा नव्याने वाट धरतो.



निरोप दिलाच आहेस
आसवांची गर्दी उगाच कशाला..
एकटेपणाचा प्रवास कायमच वाट्याला
एक एक माळेतील मोती ओघळतो
सवय असावी लागते ….
गुंतलेले मन हळवे कातर ..
त्यातही उबदार मायेची शाल
पांघरूण घ्यावी अशी सोय नाही..
कोणाला नको असते वाळवंटात पाणी
अश्रूधारांनी वाहतात का झरे..
मिटवून टाकतात का मनातील अंतरे…
खोल रूतून राहतेच मनात सल
निरोपाच्या भावुक क्षणानंतर…

अस्तित्वच शून्य तुझे माझे
देहां मधून वाहत जाते फक्त..
बदल तर कणाकणातून घडतो आहे
पानं, फूल,वारा,पाऊस, निसर्ग..
आणि व्यापलेला ज्ञात अज्ञात प्रत्येक
जण निरोप घेताना बदलत असतो..

निरोप घेताना फक्त एकच करावं
जाणाऱ्यांना दूरूनच पहावं..
सुकलेल्या फुलांना मधूनच हुंगत जावं..
मिटलेल्या पापण्यात हृदयाच्या तळ्यात
साचवत राहू नये ते निरोपाचे हुंदके..
ते हुंदक्यांचे सूर असूर बनून राहतील
तुमच्या जीवनात…

निरोप रामाने सितेला..कृष्णाने राधेला..
द्रोणाचार्यांने अश्वत्थाम्यास दिला…
अमरत्व प्राप्त झाले असूनही निरोपाच्या
प्रतिक्षेत अश्वत्थामा भटकतो..
चिरकाल तारुण्यात राहणारा
ययाती ही जळतो…
कृष्ण सखा राधेच्या श्वासात
आनंद बनून वाहतो..
निरोपाची सांगता करताना
पुन्हा नव्याने वाट धरतो.

Author