तार सेवा बंद, बार सेवा सुरु !

सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली यावर भाष्य करणारी ही वात्रटिका



सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली पण बारमधली सेवा सुरुच आहे. यावर भाष्य करणारी ही वात्रटिका

तार सेवा बंद,
बार सेवा सुरु,
आता वाजू लागतील,
पायातील घुंगरू……..

पायातील घुंगरू वाजताच,
नादावतील सारे,
नंतर त्यांच्या डोळ्यासमोर,
दिसू लागतील तारे……!

— मयुर गंगाराम तोंडवळकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →