वारी निघाली पंढरीला !

येत्या १९ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने श्री पांडुरंगी चरणी सेवा रुजू व्हावी म्हणून एक कविता..!!मी अम्बज्ञ आहे.



|| हरि ॐ ||

चालली पायवारी पंढरीला

विठुरायाच्या दर्शनाला,

विठुरायाचा नामगजर

होतसे रात्रंदिन !

नाही भूक तहान

नाही झोप विश्रांती,

ठाऊकना उन पाऊस

सर्वत्र पांडुरंग, पांडुरंग !

नाही भेदाभेद कोठे

नाही उच्चनीचा कोणी,

गरीब श्रीमंत सगळे

रंगले पांडूरंगी !

नाही भांडण तंटण

नाही रुसवा भूगवा,

नाही जात पात

मानतो सर्वधर्म समभाव !

दिंडी पोहोचली चंद्रभागा

देह विसावे क्षणभर,

दुरून दर्शन कळसाचे

भाग्य उजळे पायवारीचे !

घेता दर्शन विठ्ठलाचे

झाले सार्थक जन्माचे,

बायका मुले म्हातारेकोतारे

म्हणती वारकरी पायवारीचे !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author