भोंडले (४)







ब्लॉकचे पैसे भर ग मुली

भर ग मुली

मग जा आपल्या सासरला

सासरला

ब्लॉकचे पैसे भरले ग आई

भरले गं आई

आता तरी जाऊ का सासरला

सासरला

ब्लॉक ताब्यात घे ग मुली

घे ग मुली

मग जा आपल्या सासरला

सासरला

ब्लॉक ताब्यात आला ग आई

आला ग आई

आता तरी जाऊ का सासरला

सासरला

ब्लॉकची सजावट कर ग मुली

कर ग मुली

मग जा आपल्या सासरला

सासरला

ब्लॉकची सजावट झाली ग आई

झाली ग आई

आता तरी जाऊ का सासरला

सासरला

टेलिफोनचा नंबर लाव ग मुली

लाव ग मुली

मग जा आपल्या सासरला

सासरला

टेलिफोन आता आला ग आई

आला ग आई

आता तरी जाऊ का सासरला

सासरला

नवी गाडी घे ग मुली

घे ग मुली

मग जा आपल्या सासरला

सासरला

नवी गाडी घेतली ग आई

घेतली ग आई

आता तरी जाऊ का सासरला

सासरला

व्यवहार नाही ठाऊक तुला

ठाऊक तुला

मीही येते, रहायला.

— सौ. सुधा मोकाशी

Author