साबुदाणा वडा

साबुदाणा वड्याची पाककृती..



साहित्यः

सव्वा कप भिजवलेला साबुदाणा

२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

२ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट

दीड टीस्पून लाल तिखट

दीड टीस्पून लिंबाचा रस

बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

तेल

चटणीसाठी लागणारे साहित्य:

१/२ कप खवलेले ओले खोबरे

२ लहान हिरव्या मिरच्या

३ टेबलस्पून दही

१/२ कप कोथिंबीर

कृतीः

प्रथम साबुदाणा भिजत घालावा. साबुदाणा भिजविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणे घ्यावेत. साबुदाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी घालावे व लगेच पाणी निथळुन घ्यावे. अगदी थोडेसे पाणी शिल्लक ठेवावे व त्यावर झाकण ठेवावे. साधारण २ तासांनी त्यात लिंबाचा रस घालावा व पुन्हा झाकुन ठेवावे व साधारण १ ते दीड तास थांबावे. उकडलेला बटाटा किसून घेऊन त्यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व त्यात शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. चटणी तयार करण्यसाठी चटणीचे वरील दिलेले सर्व साहित्य मिक्सरमधून एकत्र फिरवून घ्यावे व गरमागरम वडे ओल्या खोबर्‍याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.

Author