भावनांचे बांध फुटू द्या
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकवसई मध्ये एका मुलींला हत्याराने तिच्या प्रियकराने मरेपर्यंत मारले. ४०-५०लोक नुसतं बघत होते. थांबून थांबून मुलगी मेली नाही असे पाहून पुन्हा पुन्हा मारत होता. एका झटक्यात त्याने जीव घेतला नाही. थांबून थांबून हे सर्व चाळीस-पन्नास लोक पहात होते,एक जरी पुढे आला असता व त्याला रोखले असते तर मुलीचा जीव वाचला असता. प्रियकराने १६-१७ वार त्याच्या प्रेयसी वर केले आणि प्रत्येक वार झाल्यानंतर तो बघत असे ती मेली का नाही. आजूबाजूचे लोक जवळ येऊन पाहत होते, जिवंत आहे का मेली, पण कुणाचंही धाडस झालं नाही. चार जण जर धावत गेले असते तर त्याला अटकाव होऊ शकला असता, पण मन जेव्हा दगड होतं तेव्हा पाझर फुटत नाही. मागे दिल्लीला एका तरुणीला भोसकून भोसकून मारले पण कोणीही तिला वाचवले नाही. अशा अनेक घटना आहेत, हे सर्व पाहिल्यानंतर शिक्षणा पेक्षाही मूल्यांची रुजवणूक आवश्यक बनली आहे हेच जाणवतं. आई शिकलीतर कुटुंब शिकतं पण आता एक कुटुंब शिकलं तर समाज शिकेल.
June 23, 2026