साहित्य - ललित

माकड,माणूस आणि संवेदनशीलता!

Category:

 

नुकतीच एक अस्वस्थ करणारी बातमी मी वाचली. प्रसंग असा घडला. मोठ्या शहरातील एका कचराकुंडीजवळ एक वृद्ध माणूस निपचित पडला होता. काही लोकांनी त्याची विचारपूस करीत त्याला मदतीची तयारी दाखवली.परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माणसाने लोकांच्या दयेस स्पष्ट नकार दिला.

  January 16, 2025


अवर्गिकृत

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ५

Category:

 

मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो.

  January 14, 2025


साहित्य - ललित

तुलना

Category:

 

सर्वात सुखी कोण? ही गोष्ट थोडक्यात अशी आहे.’ एक कावळा रानावनात स्वतंत्र व स्वच्छंद जीवन जगत असतो. स्वतःला तो फार सुदैवी व सुखी मानत होता. एकदा त्याला पाण्यात पोहणारे बदक दिसले. त्याचा शुभ्र रंग पाहून स्वतःच्या काळेपणाचे त्याला दुःख वाटले.

  January 12, 2025


लेखसंग्रह

झांझीबार म्हणजे प्रणयरम्य नगरी

Category:

 

झांझीबार आहेही तसेच, अगदी मस्त! पण अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवतेतले प्रचंड मोठे आव्हान ध्यानात येत आहे. झांझीबार पर्यटन विकास क्षेत्रात सर्वच ‘आलबेल’ नव्हते. एक खटकणारी गोष्ट म्हणजे विकास कार्यात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्‍यांना शिरकाव प्राप्त झाला नाही.

  January 11, 2025


लेखसंग्रह

जॉनने फडकावला झांझीबार स्वातंत्र्याचा झेंडा

Category:

 

झांझीबारचे नागरीक साखरझोपेत होते. सुमारे ८०० आफ्रिकन बंडखोरांनी बेटावरच्या पोलिस चौक्यांवर ‘जॉन ओकेलो’ या जिगरबाज म्होरक्याच्या नेतृत्वाखाली अचानक हल्ला चढवला. जबरदस्त हल्यामुळे स्तंभित झालेले पोलिस काहीही करू शकले नाहीत. बंडखोरांनी चौकीतला दारूगोळा यथेच्छ लुटला आणि रेडिओ स्टेशनवर कबजा मिळवला. अरब पोलिसांना अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण मिळाले नव्हते.

  January 10, 2025


अवर्गिकृत

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ४

Category:

 

एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.

  January 10, 2025