लेखसंग्रह

दत्ताजीराव गायकवाड – भारतीय क्रिकेटचे पितामह

Category:

 

दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते.

लेखसंग्रह

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बँकिंग

Category:

 

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही गोष्ट अलीकडच्या वर्षांत आपल्या तंत्रज्ञानाधिष्ठित जगण्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान मानले जाते आणि बँकांनी सर्वात आधी हे तंत्रज्ञान त्यांच्या सेवांमध्ये समाविष्ट करण्यास सुरवात केली आहे. अलिकडची आकडेवारी दर्शविते की बँकिंग क्षेत्र सेवा, कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ‘AI’ चा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे.

लेखसंग्रह

कथा क्रेडिट कार्डच्या उत्क्रांतीची

Category:

 

व्यवहारात चलन व नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी आपल्या देशात व जगातही अनेक ठिकाणी ‘बार्टर सिस्टिम’ किंवा ‘वस्तु-विनिमय प्रणाली’ वापरली जात असे. नंतर दगड तसेच लोखंड, जस्त, कथिल, सोने, चांदी, तांबा, पितळ इत्यादि धातूंची नाणी वापरली जाऊ लागली. पण जसा कागदाचा शोध लागला तश्या कागदाच्या चलनी नोटा व्यवहारात अधिक वापरल्या जाऊ लागल्या.

साहित्य - ललित

दिवस आणीबाणी विरुद्धच्या लढ्याचे!

Category:

 

काँग्रेस सरकारने आणिबाणी लावली त्यावेळी मी बी.एस.सी फायनल ला होतो. माझा मित्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता डॉ. गिरीश वेलणकर हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होता. आम्ही दोघांनी आपापल्या घरी सांगितले की या वेळी आम्ही ही परीक्षा देणार नाही. आणिबाणी विरुद्धच्या या लढ्यात यापुढे आम्हाला अटक किंवा काहीही होऊ शकते‌.

लेखसंग्रह

‘जुलै’चे जॉंबाज

Category:

 

‘जुलै’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या शिस्तबद्ध व सुनियंत्रित असल्याचे मानले जाते. चालू ‘जुलै’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.