कथा

सत्संगाने चोर सुधारले

Category:

 

प्राचीन काळातील गोष्ट. विंध्यच्या एका गावात चार चोर राहात होते. त्या गावाबाहेरच्या जंगलात एक साधू राहात होता. साधू गावाजवळच्या शिवालयात पूजा करायला जात असे व तेथील प्रसादावर आपली उपजीविका करीत असे. चोर साधुकडे जात असत आणि आपल्या कुकर्माबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून गरिबीमुळेच आपण चोरी करतो असे साधूला सांगत असत.

  July 2, 2025


पाकिस्तानमधला प्रवेश
लेखसंग्रह

पाकिस्तानमधला प्रवेश

Category:

 

अमेरिकेत पुन्हा जायला मिळेल न मिळेल, पण पाकिस्तानात पुन्हा जायला मिळालं तर मला ते आवडेल, असं मी पहिल्यांदा पाकिस्तानात जाऊन आलो तेव्हा म्हणालो होतो. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानात गेलो. गेलो हेही स्वप्न आणि परत आलो तेही स्वप्नच कारण एकाहून एक प्रसंगच जिवावर बेतणारे होते. पाकिस्तानातून परतलो हे सत्य, अगदी निखळ सत्य. अन्यथा पाकिस्ताननामा लिहायला माझी लेखणी शाबूत राहिली नसती.

  July 2, 2025


पाकिस्तान : माझी साहसयात्रा
लेखसंग्रह

पाकिस्तान : माझी साहसयात्रा

Category:

 

मी पहिला मराठी पत्रकार असेन की ज्याने एका मराठी वृत्तपत्रासाठी बेनझीर भुट्टो यांची मुलाखत घेतली. त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासमोर एका भारतीयाने बसणे हेच ज्या काळात दुर्मिळ दृश्य होते, ते मला घडवता आले. अर्थात त्याचे सर्व श्रेय माझे कराचीचे मित्र रकिब पुनावाला यांना मी देतो.

मला काही बेनझीर ओळखत नव्हत्या, ओळखणार तरी कशा ? पण भारतीय वृत्तपत्रातून तेही पुण्यातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच हो म्हटले आणि मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. दरवाजावर असलेल्या दारवानाने माझी चौकशी केली. बेनजीर यांच्या सचिवाने त्याला ‘इंडिया’तून एक गेस्ट येणार आहेत हे सांगितलेले असल्याने त्याने मला आत सोडले. मी मागे वळून पाहतो तो रकिब पूनावाला मला अच्छा करत दरवाजात उभे होते. तासाभरात येतो, असे सांगून त्यांनी त्यांच्या लाल रंगाच्या सुझुकी मोटरसायकलवर टांग टाकलीसुद्धा.

  July 2, 2025


पेशावरमधले थरारक स्वागत
लेखसंग्रह

पेशावरमधले थरारक स्वागत

Category:

 

लाहोरमध्ये एक रात्र काढून पेशावरकडे जायचं असल्यानं हॉटेल शाहताजवर सामानाची उचकाउचकी करत बसलो नाही. खालच्या मजल्यावर असलेल्या हॉटेल व्यवस्थापकाकडे पेशावरला कसं जाता येईल, या संदर्भात माहिती घ्यायला मी गेलो. तो मला म्हणाला, ‘आत्ता रात्री आठनंतर पेशावरला जाणाऱ्या बऱ्याच बसेस पलीकडून सुटतात. त्यांपैकी कोणतीही घेतलीत तरी पेशावरला जाता येईल. तथापि माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, की ‘तुम्ही आत्ता न जाता सकाळीच जाणं चांगलं. रावळपिंडीच्या पलीकडे घाटात गाड्या अडवून नेहमीच लुटालूट होत असते. तुम्ही भारतीय आहात.

  July 2, 2025


लाहोरच्या ग्रंथालयात
लेखसंग्रह

लाहोरच्या ग्रंथालयात

Category:

 

लाहोरमधल्या वेगवेगळ्या भागांची माहिती करून घ्यायला लागलो. मी त्याला ‘इथलं सर्वांत मोठं ग्रंथालय कोणतं?’ असा सवाल केला. तेव्हा तोच म्हणाला, “तुम्हांला दयाळसिंग ग्रंथालयाबद्दल कुतूहल दिसतंय. मी लगेचच विचारलं, “हे तुम्ही कसं ओळखलंत?” त्यावर तो छद्मीपणानं हसत म्हणाला, की ‘इथे येणारे भारतीय दयाळसिंग ग्रंथालयाविषयी न चुकता विचारतात. आता तिथे तुम्हांला जे हवं ते सापडेल असं मात्र नाही.

  July 2, 2025


गप्पा , गोष्टी आणि मृदगंध
पॉडकास्ट

गप्पा , गोष्टी आणि मृदगंध

Category:

 

InnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.

खरं तर ह्याचं श्रेय  Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये  २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह  इथे पार पडणार आहे.

आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –

  July 2, 2025


लेखसंग्रह

श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, कुरवपूर

Category:

 

श्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ जो ‘गुरुचरित्र’ त्याच्या पाच, आठ, नऊ व दहा या चार अध्यायात आलेली आहे. त्यापलीकडे त्यांची माहिती इतर कोठल्याही ग्रंथात विशेष करून मिळत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामधुन त्यांचे चरित्र सर्वश्रुत झाले आहे. श्रीगुरुचरित्र ज्यांनी लिहिले त्या श्रीसरस्वती गंगाधरांचा हेतू श्रीनृसिंहसरस्वतींची लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपादश्रीवल्लभांची माहिती त्यात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे.

  July 2, 2025


क्रीडा-विश्व

हिंदुस्तानी क्रिकेटचा विजय

Category:

 

मला आनंद झाला तो हिंदुस्थानी क्रिकेटचा विजय साजरा झाला म्हणून. मुंबई रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही याच दुःखही तेवढंच आहे. विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकताना आपण पहिल्या दोन्ही वेळेला रणजी करंडक जिंकला तो विजय आपल्या कर्तुत्वावर जिंकला होता. तसेच यंदाही आपलं कर्तृत्व त्यापेक्षाही जास्त सरस होतं यात शंकाच नाही आणि हेच त्यांनी हिंदुस्तानी क्रिकेट जगताला दाखवून दिले.

  July 2, 2025


आजच्या युगातील राजाचे आयुष्य कसे असते?
पॉडकास्ट

आजच्या युगातील राजाचे आयुष्य कसे असते?

Category:

 

अक्कलकोट संस्थानाचे श्रीमंत मालोजीराजे (|||) संयुक्ताराजे भोसले अक्कलकोटचे राजसाहेब ह्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट केला. अक्कलकोट संस्थान त्याकाळी का आणि कसं महत्वाचं होतं हे राजेंनी सांगितलं. स्वामी समर्थ आणि राज घराणे ह्यांचं काय connection आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अक्कलकोट राज घराण्याचे connection ह्याबद्दल बरीच माहिती राजेंनी दिली!
श्री स्वामी समर्थ!

  July 2, 2025


लेखसंग्रह

तुझ्या कांतिसम रक्तपताका

Category:

 

गणपतीच्या पारंपारिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.’अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे.

  July 1, 2025