शाळेचा पहिला दिवस
Category:
अवर्गिकृतशाळेचा पहिला दिवस व्हता. मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.एंक्याचा आज शाळचा पह्यलाचं दिवसं आसल्यानं पाहाटचं उठून आंघुळ करून त्ये सगळ्या देवायच्या पाया पडूनं आलतं.
January 14, 2024