Year: 2023
चित्रपटातील पर्यटन
Category:
लेखसंग्रहबदलती जीवनशैली, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, पैसा, मध्यमवर्गीयांच्या हातात खुळखुळणारा फिरण्यासाठी सहज उपलब्ध असलेली वाहतुकीची विविध साधने आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे विविध पर्यटन कंपन्या यामुळे आता भारतातीलच नव्हे तर परदेशातीलही पर्यटन स्थळांचे सर्वसामान्यांना आता विशेष अप्रूप राहिलेले नाही.
आदिवासींना पंचतारांकित करणारा छाया+चित्र+कार
Category:
लेखसंग्रह१९८४ मधील प्रसंग आहे. शोमन राज कपूर आपल्या नव्या चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन चेहरे पाहिले, पण अपेक्षित अशी एकही मुलगी त्यांना मिळाली नाही. शेवटचा उपाय म्हणून ते एका सुप्रसिद्ध फोटोग्राफरकडे गेले. त्या फोटोग्राफरने त्यांच्या संग्रहातील एका मुलीचा फोटो दाखविल्या बरोबर राजकपूर आनंदीत होऊन ओरडले, ‘हीच माझ्या चित्रपटाची नायिका! तिचं नाव काहीही असो, हिला मी मंदाकिनीच म्हणणार!’ तिचं खरं नाव होतं, यास्मिन जोसेफ. ती एक अॅन्ग्लो इंडियन मुलगी होती.
औषधांच्या दुनियेत
Category:
लेखसंग्रहआधुनिक जगात औषधे ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. भारतासारख्या महाकाय देशात औषधांची निर्मितीही अवाढव्य आहे आणि आज आपल्याकडे जवळपास १ लाख औषधे उत्पादने उपलब्ध आहेत.
माझे आवडते पुस्तक मृत्युंजय
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितलहानपणापासून मला पुस्तकवाचनाची आवड लागली आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. कथा,कादंबऱ्या, कविता, भयकथा, रहस्यकथा, नाटकं,प्रवासवर्णने आणि असंख्य प्रकारची पुस्तके असा माझा वाचनाचा जबरदस्त कॅनव्हास आहे. पु ल देशपांडे यांच्यापासून ते दया पवार ,अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य अभिजात साहित्यिकांची आणि लेखकांची अगणित पुस्तकं वाचताना मी झपाटून गेलो.विविध लेखकांच्या प्रतिभाविलासाने मी थक्क होऊन गेलो.
दिशा – पालकत्वाची
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनतसं पाहिलं तर रोहनला लहान मुलांची खूप आवड. “त्याच्या धाकट्या भावालाही त्याने अगदी प्रेमाने वाढवलं. मला सांभाळण्यासाठी काही वेगळं करायला लागलंच नाही!” असं त्याची आई सगळ्यांना अगदी आनंदाने सांगते. पण रोहनचं लग्नंच झालं नाही तर मग मुलं तर दूरच! धाकटा भाऊ मात्र आताशा लग्न करून अमेरिकेत स्थिरावला होता. त्यामुळे रोहनची आईला सदोदित चिंता भेडसावत रहायची. त्यावर तो आईला नेहमी म्हणायचा, “लग्न काय मुलं जन्माला घालायची म्हणूनच करतात का? सहचारी हवी म्हणून करतात. लग्न होईल तेव्हा होईल तू काळजी नको करू.
मी पाहिलेली ऊर्जा
Category:
लेखसंग्रहअखंड ऊर्जेचे नैसर्गिक वरदानच त्यांना लाभलं होतं जणू! ‘तुझ्यापाशी जे जे काही आहे ते मुक्त हस्ते समाजाला देत राहा तू,’ असा ईश्वरी संकेत त्यांना मिळाला असावा बहुधा आणि त्यांनी तो आयुष्यभर इमाने-इतबारे पाळला. गोरगरिबांना यथाशक्ती दानधर्मही केला.
आनंदाचे ठसे
Category:
लेखसंग्रहब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो.
औषधांची साठवण कशी करायची
Category:
लेखसंग्रहऔषधांची परिणामकारकता व सर्व गुणधर्म जपण्यासाठी त्यांची घरात योग्य ठिकाणी साठवण करणे आवश्यक असते. सूर्यप्रकाश, उष्णता, दमटपणा, पाणी यामुळे औषधांचे विघटन होऊन मुदतीआधीच ती निरुपयोगी होऊ शकतात. म्हणूनच खिडकीत, फ्रीजवर, टी. व्ही. वा ओव्हनवर, गॅसजवळ, किचन टेबलवर (चटणी, लोणच्यांच्या सोबत), बाथरूममध्ये, बेसीनजवळ अशा ठिकाणी औषधे ठेवू नयेत. कोरड्या व थंड ठिकाणी औषधे ठेवणे उत्तम. शक्यतो घरातील सर्व औषधे एका ठिकाणी असावीत.