पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता
इतर मराठी व्हिडिओज

पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता

Category:

 

पन्हाळ्यात, आम्हा पोराठोरांचा ‘व्हरायटी शो’ अगदी र्ंगात आला होता. तेव्ह्ढ्यात बंगल्यासमोरच्या ऊतारावरून् दोन स्त्रिया येताना दिसल्या, कोण होत्या बर्ं त्या? त्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद् त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय् राहिला.

अशा कोणी ‘अफलातून पाहुण्याने’ तुमच्या घरी कधी ‘ठिय्या’ दिलाय का हो?
इतर मराठी व्हिडिओज

अशा कोणी ‘अफलातून पाहुण्याने’ तुमच्या घरी कधी ‘ठिय्या’ दिलाय का हो?

Category:

 

पु.लंच्या ‘व्यक्ती आणि वल्लीमधून’ थेट पळून आल्यासारख्या भासणार्‍या या ‘वल्लीनं’ गदिमांच्या घरी तळ दिला आणि मग?

माझ्या मनाच्या खिडकीतून बाळ कोल्हटकरांना काय दिसलं?
इतर मराठी व्हिडिओज

माझ्या मनाच्या खिडकीतून बाळ कोल्हटकरांना काय दिसलं?

Category:

 

आपल्या डोळ्यातून सतत ओघळणारी, आसवं पुसण्याचा जरादेखिल प्रयत्न न करता किंचित हासून बाळ कोल्हटकर म्हणाले “आनंद! हा तुझ्या गाण्याचा परिणाम, असं समजू नकोस बरंका”!

व्यक्ती-परिचय

माजी व्हाईस ॲ‍डमिरल भास्कर सदाशिव सोमण

Category:

 

गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भास्कर सोमण हे भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते.

व्यक्ती-परिचय

सरकारी वकील उज्ज्वल निकम

Category:

 

उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात.

अरे काय सांगू बाबा तुला? आजवर मैफिलीला अण्णा असायचे रे! पण आता तर ‘स्वामी’ नाहीत!
इतर मराठी व्हिडिओज

अरे काय सांगू बाबा तुला? आजवर मैफिलीला अण्णा असायचे रे! पण आता तर ‘स्वामी’ नाहीत!

Category:

 

संगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!

दिनविशेष

जागतिक इडली दिवस

Category:

 

इडलीचा जेव्हा विषय येतो तेव्हाअप्रत्यक्षपणे साऊथचे म्हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. पण असे म्हणतात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ८०० ते १२०० इ.पूर्वमध्ये भारतात इडली आली आहे. ‘इडली’ शब्दा ची निर्मिती ‘इडलीग’ यापासून झाली होती. याचा उल्लेख ‘कन्नड’ साहित्यात आढळतो.

व्यक्ती-परिचय

लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके

Category:

 

वास्तवाच्या अनुभवातून आलेले अस्वस्थपण मांडणे ही त्यांच्या कवितेची खासियत. जेव्हा जेव्हा हे मांडणे कवितेच्या चौकटीत सामावणारे नव्हते, तेव्हा तेव्हा त्यांनी कथात्म-वैचारिक लिखाणातील शक्यता अजमावल्या. ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या असोत वा ‘मालटेकडीवरून..’सारखे ललित लेखन असो किंवा ‘कवितेविषयी’, ‘कविता म्हणजे काय?’, ‘मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक’ आदी समीक्षाग्रंथ असोत; डहाके यांच्या लेखनात विविध विषयांच्या तौलनिक अभ्यासातून आलेल्या मूल्यगर्भ चिंतनाची डूब जाणवते.