“अपरिचित जगाचे यथार्थ चित्रण”
Category:
साहित्य - ललितसमुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. समुद्रावरील जहाजे महिनोंमहिने त्या अथांग प्रवाहावरून दूरदेशी जात असतात. त्या आयुष्यात आव्हाने आहेत, साहस आहे, रोमांचकारी अनुभव आहेत. जमिनीपासून दूर जाऊन खूप मोठा काळ काढणं हा विचारच किती रोमांचक आहे. अशा सागरी जीवनाचे चित्र रेखाटणारी दोन पुस्तके अशाच प्रकारचे अनुभव व माहितीचा विलक्षण खजिना आपल्यासमोर ठेवतात.