No Picture
साहित्य - ललित

अस्तित्व

Category:

 

महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.‌ तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री देऊ शकता का?’ धर्मराजाला आपली चूक कळून आली. त्यांनी त्या वृद्धाला बोलावून घेतले व भरघोस दान दिले. भीमानं विचारलेला प्रश्न तसा छोटा असला तरी अस्वस्थ करणारा आहे. हा प्रश्र्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं. जो मला काल भेटला होता, तो आज नाहीये. जो काल माझ्याशी फोनवर भरभरुन बोलला, तो आत्ता नाहीये. असे अनेक प्रसंग आजूबाजूला नेहमीच घडत असतात.

No Picture
लेखसंग्रह

विश्व कीटक भक्षक वनस्पतींचे

Category:

 

विश्व कीटक भक्षी वनस्पतींचे हे शीर्षक वाचून बऱ्याच वाचकांचे डोळे विस्फारतील. त्यांचा विश्वासही बसणार नाही. परंतु वनस्पती जगतात अशाही वनस्पती आहेत. त्यांची ओळख आपण ह्या लेखात करून घेणार आहोत. महाराष्ट्रातही अशा वनस्पती सापडतात.

No Picture
लेखसंग्रह

नाण्यांचा विकास

Category:

 

मुघलांच्या काळात 9 रुपयांची 5 मोहोर व 5 मोहरांचे एक नाणेसुद्धा होते. अकबराच्या काळात नाण्यांमध्ये भरपूर वैविध्य होते. त्यावर राजाचे नाव टांकसाळीचे नाव, हिजरीसन, चार खलिफांची नावे, कलिमा, ईश्वराकडे मागितलेले आशीर्वाद आणि काही नाण्यांवर हिंदू देवदेवता इतके वैविध्य होते. नंतर जहांगीरने 12 राशींची 12 नाणी काढली. 1000 मोहरांपासून 12 किलो वजनाचे सर्वात मोठे नाणे काढले.

No Picture
लेखसंग्रह

प्रतिकूलतेला प्रतिसाद

Category:

 

एक तरुण लहानपणापासून मातीशी खेळण्यात मश्गुल असायचा. तो संवेदनशील, रागीट पण हुशार होता. काम करताना उपमर्द झाला तर तो तात्काळ प्रतिक्रिया द्यायचा आणि इतरांना अशावेळी हातभर दूर ठेवायचा. एके दिवशी संतप्त होऊन आणि चेहेऱ्यावर स्पष्ट दिसेल असा ताण घेऊन तो त्याच्या मित्राकडे गेला- कारण होतं वरिष्ठांचे त्याच्याशी असंवेदनशील वागणे ! हा मित्र त्याचा प्रशिक्षक होता.