भारतातील प्रवासी गाड्यांचे क्रमांक
Category:
लेखसंग्रहप्रत्येक प्रवासीगाडीला नाव असतं. नाव नसेल, तर ती गाडी जिथून निघते त्या सुरुवातीच्या स्टेशनच्या किंवा जेथे ती अखेरीस थांबते, त्या शेवटच्या स्टेशनच्या नावानं ओळखली जाते; परंतु रेल्वे स्टेशनं, तिकीट कंट्रोल रूम येथे मात्र त्या गाड्या क्रमांकानुसार ओळखल्या जातात. १०० वर्षांपूर्वी गाडीला साधा एक अंकी किंवा दोन अंकी क्रमांक असे. मुंबईहून निघणाऱ्या गाड्यांना ‘डाऊन’ गाडी व मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना ‘अप’ असं संबोधले जाई. त्याप्रमाणे डाऊन गाडीला जो क्रमांक दिला असेल, त्याच्या पुढचा क्रमांक अप गाडीसाठी दिला जाई.