भारतमातेच्या वीरांगना – २५ – उमाबाई कुंदापुर
Category:
अवर्गिकृतबिहार मधील भूकंप ग्रस्त क्षेत्र असो किव्हा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारी, उमाबाईचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता, त्याचे हात हक्काची मदत करणारे होते. १९४६ साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्ट च्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्राम सेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकार कडून कुठल्याच प्रकारची मदत नसतांना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले.