असाही एक शिष्य…
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहCategory:
कथा साहित्य - ललितलग्न ही खरंच आपली गरज आहे का ? या प्रश्नाचे उत्तर त्याला अजूनही मिळाले नाही…आता पुढच्या आठवड्यात त्याच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे …आता त्या लग्नात पुन्हा सगळे नातेवाईक कधी नव्हे ते जमा होतील आणि जमा झाले की विजयच्या लग्नाचा विषय पुन्हा ऐरणीवर येईल…काही नातेवाईक तो विषय खरंच विजयची काळजी म्हणून तर काही उपहास म्हणून चघळतील… पण कोणाचीही विजयला सरळ – सरळ विचारायची हिंमत होत नाही की तू लग्न का करत नाहीस ? कोणी जर हा प्रश्न विचारला तर विजय काय म्हणेल याचा नेम नव्हता , कदाचित तो असाही म्हणेल की मी लग्नाला एका पायावर तयार आहे माझ्यासाठी मुलगी तुम्ही शोधायची आणि लग्नाचा सर्व खर्चही तुम्हीच करायचा
Category:
लेखसंग्रहCategory:
साहित्य - ललितअंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले.
Category:
लेखसंग्रहलेखिका ह्या काव्यलेखन व ललितलेखनाबरोबरच डिझायनिंगबाबत सल्लागार म्हणूनही कार्यरत असून त्यांचा इंटिरिअर डिझाईनिंगचा ‘वास्तुआर्ट’ नामक व्यवसाय आहे.
Category:
अवर्गिकृतअसहकार चळवळ,मिठाचा सत्याग्रह अश्या सगळ्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यासाठी कारावास सुद्धा भोगला. महिलांनी स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवावा ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याच फलस्वरूप ‘आसाम प्रादेशिक महिला समिती’ १९२६ मध्ये स्थापन केली. ज्यामार्फत महिलांच्या प्रश्नांवर काम करणे, त्यांच्यासाठी शिक्षण आणि व्यवसाय उपलब्ध करणे, बाल विवाह रोकणे ह्या सगळ्या गोष्टींवर काम सुरू केले. त्यांनी हातमाग आणि हस्तकला ह्याचे महत्व महिलांना पटवून दिले व त्यावर काम करायला प्रवृत्त केले.
Category:
साहित्य - ललितअमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही.
Category:
लेखसंग्रहभुसावळ, सोलापूर आणि सांगली या ” माझ्या ” गावांमध्ये सकाळची प्रभातफेरी माझ्यासाठी अत्यावश्यक असते. शनिवारी सकाळी उठून ताजी फेरी मारली सोलापुरात !
Category:
साहित्य - ललितCopyright © 2025 | Marathisrushti