भारतमातेच्या वीरांगना – ४१ – प्रभावती देवी
Category:
अवर्गिकृतगांधीजींच्या वचना खातर प्रभावती देवी आणि डॉ जयप्रकाश नारायण ह्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचा परिवार पुढे वाढवायचा नाही असे ठरवले. केवढा मोठा त्याग हा. आपलं आयुष्य पूर्णपणे देशासाठी समर्पित केले. प्रभावतींनी असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, चले जावं चळवळ ह्या सगळ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना अनेकदा जेलयात्रा भोगावी लागली.