No Picture
लेखसंग्रह

वितळणबिंदूचं भाकीत

Category:

 

पृथ्वीवर सापडणाऱ्या विविध खनिजांचा परामर्श घेतल्यानंतर ची जून हाँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रारूपाचा उलट्या प्रकारेही उपयोग केला. या संशोधकांनी आपल्या प्रारूपाद्वारे, अतिउच्च तापमानाला वितळणाऱ्या सुमारे वीस संयुगांची सूत्रं शोधून काढली आहेत. या संयुगांचे वितळणबिंदू सव्वातीन हजार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहेत.

No Picture
साहित्य - ललित

अथांग…..

Category:

 

त्याची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो बालहट्ट पुरवत मुलांचे वेगवेगळ्या पोझेस मधले फोटो काढण्यात दंग होता. मध्येच आपल्या कॅमेऱ्यात मावळतीचा सूर्य आणि मुंबईचं देखणं रूप टिपत होता.

No Picture
लेखसंग्रह

उपचारांची दिशा बरे वाटावे की बरे व्हावे ?

Category:

 

एखादा दहशतवादी हल्ला परतवून लावणे म्हणजे दहशतवादाविरुद्धचे युद्ध जिंकणे नाही .अधून मधून होणारे दहशतवादी हल्ले ज्याप्रमाणे दहशतवाद ह्या मूळच्या सामाजिक रोगाचे केवळ लक्षण आहे . दहशतवाद कसा वाढतो , त्याची नेमकी कारणे , त्यासाठी आर्थिक पाठबळ कसे मिळते , ह्याचा जगात वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला आहे आणि निष्कर्ष हेच सांगतो की हे हल्ले हा पूर्ण प्रक्रियेतला केवळ समाजात भीती निर्माण करण्याचा एक भाग आहे . मूलतत्त्ववादी उद्दिष्टे ही याहून खूप वेगळी आहेत .

No Picture
दिनविशेष

विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ

Category:

 

विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

No Picture
लेखसंग्रह

जीवनाचे धडे आणि स्वतःशी करार

Category:

 

इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी.

No Picture
साहित्य - ललित

खांदा

Category:

 

एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त.