प्राची, पश्चिमा

सुंदर प्राची, सुंदर पश्चिमा
लालकेशरी उधळण सुंदर...

चराचराचे हे रूप अनोखे
संवेदनांची ती झालर सुंदर...

जीवन केवळ प्रवास इथला
प्रारब्धाची अटळ रेखा सुंदर...

सारीपाटाचेच फासे जीवनी
सारे, भगवंताच्या हाती दोर...

सुखदुःखांची साऊली भाळी
तिला झेलित, जगावे निरंतर...

आज मला हेच कळून चुकले
सत्यवास्तव जीवनाचे चिरंतर...

-- वि.ग.सातपुते.(भावकवी)

(9766544908)

रचना क्र.२७६

२९/१०/२०२२



सुंदर प्राची, सुंदर पश्चिमा
लालकेशरी उधळण सुंदर…

चराचराचे हे रूप अनोखे
संवेदनांची ती झालर सुंदर…

जीवन केवळ प्रवास इथला
प्रारब्धाची अटळ रेखा सुंदर…

सारीपाटाचेच फासे जीवनी
सारे, भगवंताच्या हाती दोर…

सुखदुःखांची साऊली भाळी
तिला झेलित, जगावे निरंतर…

आज मला हेच कळून चुकले
सत्यवास्तव जीवनाचे चिरंतर…

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

(9766544908)

रचना क्र.२७६

२९/१०/२०२२

Author