No Picture
साहित्य - ललित

पैज

Category:

 

अंधारी रात्र, थंडी पडली होती. पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका हिवाळी रात्री आपण दिलेल्या पार्टीची आठवण करत राष्ट्रियीकृत बँकेचा सीनियर मॅनेजर धनानंद शतपावलीच्या येरझाऱ्या घालत होता. बुध्दिमान म्हणून गणले जाणारे बरेच मित्र होते त्या पार्टीत. गप्पागोष्टी, चर्चा होत होत्या त्याही गंमतीदार, लालित्यपूर्ण अशा. मृत्युदंड असावा की नसावा हा एक अहमहमिकेच्या वादविवादाचा विषय होता.

No Picture
साहित्य - ललित

पोलिस-चोर आणि भजन (संक्षिप्त रूपांतरीत कथा २७)

Category:

 

भिवा नाक्यावरच्या बाकावर बसल्याजागीच अस्वस्थ हालचाली करत होता.
पावसाळा जवळ येत होता.
मुंबईचा पावसाळा म्हणजे त्रासदायक.
दुकाना दुकानात लावलेल्या छत्र्या आणि रेनकोट जाहिर करत होते की पावसाळा जवळ आलाय.
लोकांची खरेदी सुरू होती.
कावळे घरटी बांधत होते.
No Picture
लेखसंग्रह

आत्मनिर्भर भारत : प्रतिमान देशी विकासाचे

Category:

 

कोरोना महामारीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे ‘टाळे’ उघडताना केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले होते. हे पॅकेज देताना ‘आत्मनिर्भर भारत’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेची घोषणा केली. भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आणणारी ही घटना होती. यानंतर सबंध देशभरात ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेविषयी मोठी चर्चा सुरू झाली.

No Picture
अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 1 : मातंगिनी हाजरा

Category:

 

१९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली.

No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ अभिनेत्री रत्नमाला

Category:

 

दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापक सुरेंद्र दातार

Category:

 

मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली नाट्यसंस्थेत त्यांनी व्यवस्थापक म्हणून काही काळ काम केले रातराणी, पांडगो इलो रे ब इलो, आई रिटायर होतेय अशा अनेक नाट्यप्रयोगांचे त्यांनी व्यवस्थापन केले नंतर १९९२ मध्ये चंद्रलेखा या मान्यवर संस्थेत त्यांना मोहन वाघांनी बोलावून घेतले आणि २०१० पर्यंत(चंद्रलेखा संस्था बंद होई पर्यंत) ते चंद्रलेखामध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

No Picture
व्यक्ती-परिचय

पुराभिलेख आणि नाणकशास्त्र तज्ज्ञ डॉ. शोभना गोखले

Category:

 

शोभना गोखले यांनी विदर्भातील वाशिम (प्राचीन वत्सगुल्म) जवळील हिस्सेबोराळा येथे वाकाटक राजवंशातील देवसेनाच्या ब्राह्मी लिपीतील लेखाचा शोध लावून त्यामध्ये शक ३८० हा उल्लेख असल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे वाकाटककालीन इतिहासाच्या अभ्यासात या लेखाने मोलाची भर घातली. तसेच जुन्नर येथील नाणेघाटातील लेण्यामधील सातवाहन सम्राज्ञी नागनिका हिच्या ब्राह्मी लिपीतील लेखावर संशोधन करून लेखातील २८९ हा आकडा आणि त्याचे वाजपेय यज्ञातील महत्त्व अधोरेखित केले.

No Picture
साहित्य - ललित

मुक्काम पोस्ट एक हजार – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने…

Category:

 

या एक हजार कार्यक्रमांच्या दीर्घ प्रवासात सतत तीस वर्षे ज्यांनी मला साथ दिली आणि कायम पाठिंबा दिला, त्या रसिक प्रेक्षकांचे ऋण तर मी फेडूच शकत नाही. त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन. ज्याने माझा हा प्रवास जवळून पाहिला आहे, असा आजचा आघाडीचा संगीतकार कौशल इनामदार याने त्याची अनेक कामे बाजूला ठेऊन या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली म्हणून त्याचे आभार मानतो.