सवाई माधवराव पेशवे
Category:
व्यक्ती-परिचयसवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले.