जागतिक सर्कस दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं जीवनविश्वही वेगळंच असतं. इथं काम करणारे कलाकार हे स्वयंप्रेरणेन आलेले असतात. ते विविध प्रांतांतून, देशातून आलेले कलाकार म्हणजे ते एक कुटुंबच असतं. त्यामुळं त्यांच्यात एक कौटुंबिक ओलावा असतो. सर्वसाधारणपणं रशियन सर्कस जागतिक पातळीवर श्रेष्ठ म्हटली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे शोमॅन दिवंगत राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट कोण विसरेल. या चित्रपटानंच सर्कशीचं अंतरंग उलगडून दाखवताना ‘दुनिया एक सर्कस है’ हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवलं.