बालनाट्य उद्याचे (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ५)
Category:
साहित्य - ललितआजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं…