व्यक्ती-परिचय

प्रसिद्ध लेखक अनिल धारकर

Category:

 

निल धारकर यांनी देबोनायर, मिड-डे, संडे मिड-डे, द इंडीपेंडेंट व द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मध्ये काम केले होते. अनिल धारकर हे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये मुंबईत होणाऱ्या लोकप्रिय मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे संस्थापक होते. दक्षिण मुंबईत आर्ट मुव्ही थिएटर (आकाशवाणी सभागृहात) सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

  March 26, 2022


किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!
दिनविशेष

किर्लोस्करवाडी : महाराष्ट्राचा मानबिंदू!

Category:

 

सुरुवातीला किर्लोस्करवाडीत फक्त पाण्याचे पंप बनत होते. किर्लोस्करांचे पंप इतके लोकप्रिय झाले की, पुढे पंप म्हणजे किर्लोस्करांचे, अशीच ख्याती झाली. किर्लोस्करांनी पुढे आपल्या उत्पादनांचा पसारा वाढवला आणि डिझेल व विजेवर चालणाऱ्या पंपांबरोबरच यांत्रिक नांगर, ट्रॅक्टर्स अशा शेती उत्पदनांसाठी लागणाऱ्या यंत्रांचीही निर्मिती तिथेच सुरू झाली.

  March 26, 2022


व्यक्ती-परिचय

साहित्यिक बाबूराव रामजी बागुल

Category:

 

बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं.

  March 26, 2022


व्यक्ती-परिचय

गीतकार व संगीतकार आनंद शंकर

Category:

 

आनंद शंकर यांनी १९६० च्या दशकात लॉस एंजेलिसचा दौरा केला. येथे त्यांनी रॉक संगीतकार ‘जिमी हेंड्रिक्स’ सारख्या पाश्चात्य संगीत दिग्गजांसोबत काम केले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १९७० साली त्यांचा पहिला संगीत अल्बम प्रसिद्ध झाला. इथेच त्यांनी सतारीवर आधारित ‘रोलिंग स्टोन्स’, ‘जम्पिन जैक फ़्लैश’ व ‘लाइट माय फायर’ यासारख्या वेस्टर्न हीट केल्या की ज्या खूप लोकप्रिय झाल्या.

  March 26, 2022


दिनविशेष

चिपको आंदोलनाला आज ४९ वर्ष पूर्ण झाली

Category:

 

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली.

  March 26, 2022


कथा

गुप्तहेर गोमु – भाग २ (गोमुच्या गोष्टी – भाग १४)

Category:

 

रूम उघडून ती अचानक वळली आणि तिने गोमुचा हात धरला. “आंत या, ना !” असे म्हणत तिने गोमुला रूममध्ये ओढला. भांबावलेल्या गोमुने कांहीच विरोध केला नाही. “मी आवडले कां तुम्हांला ? कालपासून माझ्या मागे मागे आहांत. मी पाह्यलेय. मग आतां कां लाजतां ?” गोमुला कांहीच उत्तर सुचेना.

  March 26, 2022


साहित्य - ललित

नागबळी – Part 2

Category:

 

तालमी सुरु झाल्या पण म्हणावी अशी गती येत नव्हती. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला. तसतसे वातावरण तापू लागले. शेवटी परीक्षा जवळ आल्या म्हणजे जसं आखलेलं वेळापत्रक बाजूला पडतं आणि दिवस रात्र अभ्यास चालू होतो तसंच झालं. आजपर्यंत हा नाही आला, तो नाही आला अशी टंगळमंगळ चालू होती. ती जाणवू लागली. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते त्यांचा फारसा प्रश्न नव्हता. पण ज्यांचे सहकार्यक्रम होते. त्यांना एकत्र जमणे आवश्यक होते. नाटिका तयार करणाऱ्यांना तर आता एकत्र जमून तालमी करणे गरजेचे होते. आम्हाला आता वेळ कमी पडू लागला. तालमींची वेळ हळूहळू वाढत चालली होती. रात्री सात आठपर्यंत चालणाऱ्या तालमी आता दहा दहा बाराबारा वाजेपर्यंत आटपेनात. आता सगळ्यांनाच एक प्रकारची झिंग चढू लागली होती. अगदी झपाटून गेले होते सगळे.

  March 25, 2022


दिनविशेष

मुंबईचा जावई’ चित्रपटाची बावन्न वर्षे

Category:

 

या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, आज कुणीतरी यावे, कारे दुरावा कारे अबोला, कशी करु स्वागता अशी या चित्रपटात गाणी आहेत. या चित्रपटाचे काही चित्रीकरण गिरगावातील खोताची वाडीतील खंडेराव ब्लॉक येथे झाले होते.

  March 25, 2022