लेखसंग्रह

स्मृती-विस्मृती

Category:

 

मानवी मेंदू सर्व प्राणिमात्रांच्या मेंदूंपेक्षा प्रगत आहे. विचार करण्याची क्षमता, सामाजिक भान व भाषा ही माणसाची वैशिष्ठ्ये आहेत. आपली माहिती साठविण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षा तसेच आपल्या आयुष्यातील गरजेपेक्षा खूप-खूप जास्त आहे. मिळविलेल्या माहितीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करत असतो. मेंदूत साठविलेल्या माहितीला `स्मृती’ म्हणतात. योग्य वेळी ही माहिती वापरता येणं म्हणजे स्मरणशक्ती चांगली असणं. ही माहिती काही कारणाने आठवली नाही तर ती `विस्मृती’.

लेखसंग्रह

प्रकाशात न आलेले सर्ग !

Category:

 

कित्येक कवी,लेखक,साहित्यिक आपले सगळेच लिखाण छापतात/ प्रकाशात आणतातच असे नाही. खूपसे सर्ग अंधारातच राहतात. आपल्या-तुपल्या सारखे रसिक अतृप्त राहतात जीवनभर -आपला काहीच दोष नसतानाही या खजिन्या पासून आपण वंचित राहतो. खूपसे गायक/ अभिनेते त्यांचे सगळे कर्तृत्व पडद्यावर/रंगमंचावर आणतातच असे नाही.

कथा

ससा

Category:

 

प्रातिभा आाणि विजयचा नुकताच  विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण  घरच्यांच्या आग्रहाखातर  नाईलाजानं  त्याला तस करावं लागलं  होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने  बहुदा नसावित.

साहित्य - ललित

निरोप्या!

Category:

 

उंच्यापुऱ्या भारदस्त विष्णुपंतांनी शेजारच्या तांब्याच्या पेल्यातले पाणी, तोंड वर करून नरड्यात ओतले. पांढऱ्याशुभ्र धोतराच्या सोग्याने, ओल्या मिश्या साफ केल्या. गरमागरम चहा बशीत ओतून मन लावून पिला. चहा पिताना, अभिमानाने आपल्या वाडलोपार्जीत, भव्य दगडी तटबंदी असलेल्या वाड्यावरून समाधानाने नजर फिरावी. हत्तीवर अंबारीत बसून त्यांचे पूर्वज, या समोरच्या वीतभर रुंद भरीव लोखंडी दाराच्या कमानीतून येत असत!

लेखसंग्रह

लाईटबोर्ड उर्फ लर्निंग ग्लास

Category:

 

जेव्हा आपण मुलांकडून दिवसाचे चार तास ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायची अपेक्षा करतो तेव्हा विविध गोष्टींचा वापर करून आपली लेक्चर्स जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कशी होतील याची जबाबदारी प्रत्येक लेक्चररची असते. गुगल मीट किंवा झूम वर घेतलेली त्याच त्याच प्रकारची लेक्चर्स कंटाळवाणी ठरू शकतात.