लेखसंग्रह

हाय’ आणि ‘बाय’ च्या मधील ‘फिर जिंदगी’

Category:

 

२००४ साली माझ्या विद्यार्थ्यांचे-राधामोहनचे निधन झाले, कारण अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या वडिलांनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती केली होती- ” बाबांनो, वाहन चालविताना हेल्मेट घाला. माझ्यावर आज जी पाळी आली आहे, ती तुमच्या पालकांवर कधीही येऊ नये. ” या प्रसंगावर आधारित माझी “हेल्मेट ” ही कथा २०२० च्या “तरुण भारत ” च्या दिवाळी अंकात आली आहे.

  June 10, 2021


साहित्य - ललित

ठाकूर मॅडम

Category:

 

बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते.

  June 10, 2021


साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १७)

Category:

 

आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..

  June 10, 2021


नॉस्टॅल्जिया

कुंकू… काल आणि आज

Category:

 

भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे.

  June 10, 2021


नॉस्टॅल्जिया

पावसाचे संदर्भ…

Category:

 

रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात..

  June 9, 2021


नॉस्टॅल्जिया

चिचा

Category:

 

आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.

  June 9, 2021


नॉस्टॅल्जिया

आनंदें भीमदर्शनें !

Category:

 

पुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच. थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत.

  June 9, 2021


साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १६)

Category:

 

माझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .

  June 9, 2021