साहित्य - ललित

हाथ छूटे भी तो’ – सांत्वनांचे टाहो !

Category:

 

काल राहुल देशपांडेंचे तू-नळीवरील ताजे ताजे ” माई री, मैं कासे ” ऐकत होतो आणि अचानक “पिंजर ” मधील या गाण्याची आठवण चमकून गेली. गुलज़ार / उत्तम सिंह आणि जगजीत यांचे ” हाथ छूटे भी तो ” माझ्याकडील “मरासिम ” च्या कॅसेट मध्ये होतं. तलम रेशमी, जीवन पचविलेल्या आवाजात जगजीतने ते गायले आहे.

साहित्य - ललित

जगण्याला पार्श्वभूमी बनलेला ‘लताचा’ आवाज !

Category:

 

लता कायम या वेदनांचा आवाज बनते. फक्त स्त्रियांच्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच वेदनांना बोलता येत असतं /व्यक्त होता येत असतं तर त्या सगळ्यांनी एकमुखाने (!) तिचाच आवाज निवडला असता, इतका तो “संपूर्ण ” आणि “अमर्त्य ” आहे.

साहित्य - ललित

जहाँ पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं !

Category:

 

काहीजणांसाठी “बसेरा ” महत्वाचा असतो. त्यांची पाळेमुळे एकाच मातीत घट्ट रुजलेली असतात. ऊन-वारा-पावसाचा सामना करीत ते जागा सोडत नाही. मग भलेही थोडावेळ सूर्यप्रकाश मिळाला नाही तरी बेहत्तर! ते पर्यायी उजेडाची सोय करतात. याउलट माती-बदलू माणसे गांवोगांवी रोजचा सूर्य धुंडाळत फिरत असतात.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

क्षण !!

Category:

 

प्रदीर्घ प्रवासानंतर आणि दमवणाऱ्या कष्टांनी थकलेले आपण
उभे राहतो खोलीच्या मध्यावर किंवा घर- अर्धा एकर , मैलभर, बेट ,देश

लेखसंग्रह

विचारांचा उपवास

Category:

 

प्रत्येक जण स्वतः ला सर्वोपरी भरपूर होण्याची इच्छा बाळगतो, ह्या इच्छांचा कुठे ही अंत नाही. एकाची पूर्ती झाली की लगेच दुसरी इच्छा जन्म गेले. कधी-कधी खूप कष्ट करून इच्छा पूर्ण केल्या जातात तर काही ईश्वराच्या दारी पूर्ण व्हाव्या अशी इच्छा असते. ईश्वराने त्या पूर्ण कराव्या ह्या अट्टाहासापोटी आपण उपवास करत राहतो .

लेखसंग्रह

शांतिपाठ – आ नो भद्राः क्रतवो – मराठी अर्थासह

Category:

 

ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील एकोणनव्वदावे हे सूक्त शांतिपाठ म्हणून ओळखले जाते. यातील ‘ भद्रं कर्णेभिः ’ व ‘ स्वस्ति न इन्द्रो ’ या दोन ऋचा विशेषत्वाने सर्वसामान्यांना परिचित आहेत. या सूक्ताचे रचयिता गौतम राहूगण ऋषी असून देवता विश्वेदेव आहे. परंतु पूषन व मरुत गण यांनाही आवाहन केलेले असून दहाव्या ऋचेत अदिती देवता सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. हे सूक्त जगती, विराटस्थाना व त्रिष्टुभ अशा तीन छंदात रचलेले आहे. ऋचांमधील अक्षरांची संख्याही वेगवेगळी दिसते. ऋग्वेदाखेरीज इतरही धर्मग्रंथांमध्ये हे सूक्त समाविष्ट आहे.

लेखसंग्रह

सुमंत उवाच… लेखमालिका परिचय

Category:

 

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे