हॉस्पिटल मधून पलायन (नशायात्रा – भाग २३)
Category:
अवर्गिकृतआई भावाला रागवत होती ते पाहून मला बरे वाटत होते , मनातल्या मनात मी ‘ मला मर म्हणतोस काय ? बघ आता मजा ‘ असे म्हणत होतो . त्या काळी माझ्या उडाणटप्पू पणा करण्याच्या आणि बेताल वर्तनाच्या जो आड येईल तो मला माझा शत्रू वाटत असे आणि माझ्या शत्रूंमध्ये सर्वात पहिला नंबर मोठ्या भावाचा होता कारण तो नेहमी माझ्या भानगडी शोधून काढत असे आणि माझ्या स्वैर जगण्याच्या आड येत असे .