No Picture
कथा

नवरात्र …माळ आठवी

Category:

 

आज सक्काळपासून पाऊस कोसळतोय नुसता … सगळीकडे थंडगार झालंय … बाहेर फक्त पावसाचा आवाज … त्यात हा सुट्टीचा आळसावणारा मूड !
सकाळी मस्तपैकी गरम गरम आल्याचा चहा आणि भजी झालीत .. दुपारीचं ही असंच काहीबाही … आता बसलेय .. निवांत .. आपलं आपल्या मधेच गुंगून जाणं अनुभवायला !
हया कोसळणाऱ्या पावसाला ना नुसतं बघत रहावंस वाटतं .. सगळीकडे धूसर धूसर ! . आणि त्याचा एका लयीतला आवाज ! काहीच करु नये … त्याच्या समोर शांत बसावं .. त्याचं म्हणणं ऐकावं .. मग जणू त्यालाही बरं वाटतं आणि तो द्रुत लयीत बरसायला लागतो …
अशा पावसाळी हवेत कवितेची सोबत मला फार हवीहवीशी वाटते … काचांवर ओघळणारे थेंब पाहिले अन् शांताबाईच्या ओळी आठवल्या ..
“आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे “

No Picture
परिचय - परिक्षण

गोष्ट एका खर्‍या इडियटची (पुस्तक परिचय )

Category:

 

शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होताना आपल्या मनात आपल्या भावी आयुष्याविषयी खूप वेगवेगळ्या कल्पना असतात. पैकी काही स्वप्नाळू असतील तर काही वास्तववादी! स्वप्नाळू वाटत असलेल्या कल्पना जर प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर त्यासाठी स्वत:च्या  विचारांची आपल्या स्वत:ला खात्री असणं आणि आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्वाचं ठरतं. असाच एक स्वप्नाळू वाटणारा, सरधोपट वास्तवाशी फारकत घेणारा निर्णय एक युवती घेते… आणि त्यानंतर काय काय घडतं तिच्या आयुष्यात याचा पट मांडला आहे “गोष्ट एका खर्‍या इडीयट ची’ या पुस्तकात!

No Picture
साहित्य - ललित

व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग २

Category:

 

कोणत्याही राष्ट्राचा कणा ही त्याची अर्थव्यस्था आणि संस्कृती ,ह्यातून तुम्हाला देशाची खरी ओळख मिळते. तर आज आपण निघुयात व्हिएतनाम च्या मुंबई बघायला…..हा असा जगातील एकमेव देश आहे कि जिथे तुम्ही उतरलात तरी तुम्हाला करोडपती झाल्याचा आभास होतो…जणू काही तुम्ही आताच कौन बनेगा करोडपती जिंकून आलात.

No Picture
लेखसंग्रह

सिंगापूर

Category:

 

सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय