साहित्य - ललित

रुद्रा – कादंबरी – भाग १५

Category:

 

राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता.
“हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!”
“सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ”
“धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!”
“हो, सांगितलं शकीलने.”

  March 26, 2019


लेखसंग्रह

राग आलाय? शांत होण्यासाठी हे करून पहा

Category:

 

जर एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर कमी अधिक प्रमाणात रागही येतो आणि माणसाला राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण हा राग जर तीव्र असेल तर काही विपरीतही घडू शकते, भांडणे मारामाऱ्या होऊ शकतात एकूणच काय तर वातावरण बिघडतंच, पण शरीरावरही वाईट परिणाम होतो.

  March 25, 2019


लेखसंग्रह

समांतर ब्रम्हांड

Category:

 

या विश्वामधे अनेक ठिकाणी अनेक Universes असू शकतात आणि त्यातील काही असे असू शकतात की तिथे तुमच्या हुबेहूब जीवनाचे प्रति रूप असू शकते अर्थात समांतर ब्रम्हांड. अशी ही Theory सांगते.

  March 25, 2019


लेखसंग्रह

आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग १-ब

Category:

 

आमचे ज्ञानी विद्वान आजही शंका काढतात की आमची संस्‍कृती इतकी प्राचीन असती तर तसे अनेक पुरावे सापडायला हवे होते. खरं म्‍हणजे अशी शंका मांडण्‍यापूर्वी त्‍यांनीं कांहीं गोष्‍टी ध्‍यानांत घ्‍यायला हव्‍या. एक म्‍हणजे भारतातील हवामान. भारतातल्‍या मान्‍सूनच्‍या पावसामुळे व दमट हवेमुळे लाकडी बांधकाम व भूर्जपत्रांवरील लेखन हें नष्‍ट होणारच ; तें शतकानुशतके टिकणें अशक्‍यच आहे. भारतातील सर्वच महत्त्वाची शहरें हजारो वर्षांपासून ‘जिवंत शहरे’ (Living Cities) आहेत हे सर्वमान्‍य ऐतिहासिक सत्‍यही येथें लक्षात घ्‍यायला हवें.

  March 25, 2019


व्यक्ती-परिचय

ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे

Category:

 

वर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो.

  March 25, 2019


साहित्य - ललित

अशी ही व्यापाराची तर्‍हा

Category:

 

कैरोमधल्या पिरॅमिडबद्दल शाळेत असल्यापासून कुतूहल होतंच. Chariots of Gods आणि इतर काही पुस्तकांमधून पिरॅमिड व तत्सम इतर अवाढव्य कलाकृतींबद्दल वाचून त्याविषयीचे आकर्षण वाढले. एवढे अवाढव्य काम कोणी केले असेल, कशासाठी केले असेल याची उत्सुकता निर्माण झाली. ‘चॅरिएट्स ऑफ गॉड’ मध्ये ब-याच आश्चर्यकारक जागांचा व बांधकामांचा उल्लेख आहे. हिस्ट्रीचॅनलवर तेंव्हा एक‘ एनशियंट एलियन्स ’म्ह्णून एक मालिकाही बघण्यात आली व नास्काच्या रेषा, पिरॅमिड्स, चीनची भिंत वगैरे ब-याच माहितीची भर पडली.त्यातल्या त्यात  पिरॅमिडस हे जरा जवळचे वाटले. म्हणून पिरॅमिडच्या तीव्र ओढीने आम्ही इजिप्तचा विचार करू लागलो म्हटले तरी चालेल.

  March 24, 2019