माझे आवडते कथा लेखक – द.मा.मिरासदार
Category:
साहित्य - ललितद.मा.मिरासदार यांचा कथांची वैशिष्टे किती आणि कशी सांगावीत? त्यांची कोणतीही कथा घ्या. ती एक सारखी चालूच रहावी आणि ती आपण ती सारखी ऐकत राहावी असे वाटते. त्यांची कथा एकाच वेळेस वात्रट आणि गंभीर असू शकते. त्यांच्या कथा गोष्टी वेल्हाळ असतात पण कंटाळवाण्या नसतात. त्यांच्या कथात एक मिस्कीलपणाची झाक असते. कथा कधीच एकसुरी होत नाही. एक गमतीदार विक्ष्कीप्तपणा त्यात भरलेला असतो.