कथा

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग १

Category:

 

“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले.

कथा

अडुसष्ट वर्षांपू्र्वी – भाग ३

Category:

 

याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं.

कथा

अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग २

Category:

 

मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं.

कथा

अडुसष्ट वर्षांपूर्वी – भाग १

Category:

 

मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो. तो दिवस मला आठवतो. 30 जून ही तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस-‘मंथ एण्ड’ म्हणून शाळेला अर्धा दिवस सुट्टी मिळाली होती. म्हणजे शाळेचं काम चालूंच होतं पण मुलांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळाली होती. कोंडवाड्यातून सुटल्याप्रमाणे मी धावत घरी आलो.

अवर्गिकृत

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय

Category:

 

अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्‍यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे…… जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे…..

अवर्गिकृत

कवी आणि कविता

Category:

 

कविता कशी करतात माहित नाही. पण कविता वाचताना एक अनोखा आनंद होतो. किमान मला तरी होतो. आणि आणखीन एक विचार मनात चमकून जातो.आपण का नाही करू शकत अश्या कविता? यातला प्रत्येक शब्द परिचित आहे ,त्यांचा अर्थ आपण जाणतो .मग मी का नाही करुशकत कविता? सराव नाही म्हणून? सरावाने जमेल?

लेखसंग्रह

टॅक्स डिडक्टर्स अकाऊंट नंबर

Category:

 

टॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन. पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही.