साहित्य - ललित

कृष्णा- कोयना- सख्ख्या बहिणींचा प्रितीसंगम

Category:

कराडचा प्रीतिसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रीतिसंगम मात्र त्याला अपवाद.

साहित्य - ललित

बायकांचे डोके

Category:

बायको गावंढळ असो वा उच्च शिक्षीत , सर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो !!!!
लक्ष देऊन वाचा
भातात पाणी जास्त झाल्यास…
तांदूळ नवीन होता,
चपात्या कडक झाल्यास…
मेल्याने चांगले दळून दिले नाही,
चहा गोड झाल्यास…
साखर जाड होती
व तो पातळ झाल्यास…
दुधात पाणी जास्त होतं,
लग्नाला किंवा Function ला जाताना…
कुठली साडी नेसू?

साहित्य - ललित

कवी अनिल यांची एक आठवण

Category:

मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले.

साहित्य - ललित

बा. सी. मर्ढेकर यांचा नवीन पाऊस

Category:

अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.

साहित्य - ललित

“बा.भ. बोरकरांचा हिरवा पाऊस !

“विंदां”चा लाल पाऊस

कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणजे एक आनंदयात्री !

Category:

अगदी ढोबळ मानाने पाहिले तर व्यंगचित्रा ( cartoon ) मध्ये एखाद्या व्यक्तीमधील न्यून अधिक प्रकर्षाने दाखविले जाते तर व्यक्तिचित्रा ( portrait ) मध्ये चांगल्या गोष्टी प्रामुख्याने दाखविल्या जातात आणि एखादे न्यून असलेच तरी ते दुय्यम ठरते. तर अर्कचित्रात ( caricature ) मुख्य वैशिष्ठ्ये अधोरेखित केली जातात.

साहित्य - ललित

अवघा रंग एक झाला !

Category:

किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. आज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा आहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ? अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्‍यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात….. रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो

साहित्य - ललित

बनगरवाडीचा लेखक – व्यंकटेश माडगुळकर

Category:

मी वाचन सुरु केल्यानंतर पहिल्या उत्साहात खूप पुस्तकं वाचली. खुप म्हणजे बरीच पुस्तकं वाचली. अक्षरशः एका दिवसात चारचाराशे- पाचपाचशे पानाची पुस्तकं मी संपवली आहेत. तो उत्साह आता कुठे गेलं कळत नाही. असंच एक दिवसात मी एका बैठकीत ‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचून काढलं होतं. जी अनेक पुस्तकं कायम लक्षात राहतात त्यापैकी बनगरवाडी हे आहे. मल वाटत नाही कि ती कादंबरी वाचताना लागलेला वेळ आणि मिळालेला आनंद कधी विसरला जाईल. सगळं आयुष्य लहानपणापासून शहरात गेलेलं आहे. आणि बनगरवाडीची सगळी गोष्ट त्या ग्रामीण भाषेत आहे. त्यामुळे सुरवातीला ती भाषा आणि ते जीवन अनभिज्ञ वाटत राहतं. पुस्तकातल्या जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तसाच आपल्या रोजच्या जगण्यातही आहे.