लेखसंग्रह

राष्ट्रप्रेम;व्यक्त करणं आणि दाखवणं-

Category:

 

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली.

लेखसंग्रह

सधन असताना आरक्षण मागणे हे लाचारीच

Category:

 

आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही.

लेखसंग्रह

सिद्धी जगण्याची

Category:

 

खरं तर मला भिक किंवा भिकारी हे शब्द, कोणत्याही, कोणच्याही आणि कशाच्याही संदर्भात उच्चारायला किंवा लिहायलाही आवडत नाही. त्या ऐवजी मी ‘दान’ किंवा ‘दान मागणारा’ असा शब्दप्रयोग करायचा प्रयत्न करतो, परंतू ‘दान’ देवळाच्या आत आणि बाहेर, ते व्हाया ‘सुटे गिराण’ निवडणूकप्रसंगी देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत, असे सर्वच वेळप्रसंगी मागत असतात. पुन्हा या दानाला, ती भिकच असली तरी, प्रसंगानुरून वेगवेगळी भारदस्त नांवंही असतात. त्यामुळे मला जे पुढे सांगायचंय, त्याचं नीट आकलन तुम्हाला होणार नाही, म्हणून या लेखापुरता मी ‘भिक’ आणि ‘भिक मागणे’ असे दोन्ही शब्दप्रयोग करणार आहे.

लेखसंग्रह

आमच्या मनात तुमच्याविषयी चीड आहे

Category:

 

सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते वेळीच शहाणे झाले नाहीत तर त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि पर्यायाने भारतातील लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेचं भवितव्य अवघड होईल यात मला तरी शंका नाही..!

लेखसंग्रह

कंडोमच्या जाहिरातीवरील वेळबंदी आणि नेहेमीप्रमाणे दुटप्पी आपण..

Category:

 

आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. आपल्याला अडचणीच्या असणाऱ्या गोष्टींवर बंदीची मागणी करायची आणि आपणच मिटक्या मारत बघत असलेल्या वा करत असलेल्या, परंतू समाजस्वास्थ बिघडवण्याची ताकद असलेल्या गोष्टींवर सोयीनुसार गप्प राहायचं, ही आपली दुटप्पी मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली, इतकंच..!!

लेखसंग्रह

पाण्याचा असाही उपयोग

Category:

 

आपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत? मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की…..

लेखसंग्रह

बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट..

Category:

 

मुंबई शहरात विविध ठिकाणी दिसत असलेला हा संदेश नेमका कसला आहे आणि तो कोणी लिहिला आहे हे शोधून काढण हे तपास यंत्रणांच काम आहे व ते ते करतही असतील असं मी समजतो. याकडे आपलं लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच.

लेखसंग्रह

सौ में से नब्बे बेईमान, मेरा भारत सच मे महान !

Category:

 

एका अनपढ ट्रक ड्रायव्हरच्या ट्रकवरच्या या वाक्याला आपल्या देशाचं ब्रिदवाक्य म्हणून मान्यता द्यायला हरकत नाही..! जनतेची व देशाची फिकीर तुम्हा-आम्हाला. या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांना तर आपल्या भावी पिढ्यांची फिकीर पडलीय.. मग तुमच्या आमच्या कितीही पिढ्या बरबाद झाल्या किंवा ढेकणासारख्या चिरडून मेल्या किंवा वांग्यासारख्या खरपूस भाजून मेल्या तरी चालतील..!!