लेखसंग्रह
पाल, माणूस व महापुरुषांची वाटणी..
Category:
लेखसंग्रहकधीतरी, कुठेतरी वाचलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं हिन्दीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींची साम्य माणसाशी असल्याचं जाणवलं..फरक एकच अाहे पाल कितीही लहान अथवा मोठा किडा असो, तिच्या प्राणी धर्माला जागून, भुक लागल्याशिवाय त्याला गट्टम करत नाही तर मनुष्य मात्र भुक असो वा नसो, नजरेच्या पट्टयात आलेल्या सावजाला गट्टम केल्याशिवाय राहात नाही..