Year: 2016
मिक्सड् फ्रूट सरबत
Category:
खाद्ययात्रासंत्री, मोसंबी व अननसाचा रस काढून घ्यावा. जेवढा रस त्याच्या दीडपट साखर घ्या. साखरेच्या निमपट पाणी घालून एकतारी पाक करा. पाक निवल्यावर त्यात फळांचा रस घाला. बाटलीत भरा.
मसाला क्युकंबर (काकडी)
Category:
खाद्ययात्राबर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.
मॅंगो केशर लस्सी
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा. त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध, साखर, केशर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावे .ही तयार झालेली लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी. सर्व्ह करतेवेळी ग्लासेसमध्ये लस्सी ओतून घ्यावी व वरून बदाम पिस्त्याचे काप घालावेत.
लेमोनेड सरबत
Category:
खाद्ययात्रामंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळून दोन तास पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घाला. लिंबू रस गाळून त्यात टाका आणि चांगले मिसळा.
केशरी सरबत
Category:
खाद्ययात्रामंदाग्नीवर जाड बुडाच्या भांड्यात साखर, पाणी एकत्र करुन ठेवा. हालवत रहा. साखर विरघळून घ्या. मग त्यात सायट्रिक अॅसिड टाका आणि मिसळून घ्या. ते पूर्ण विरघळल्यावर हे मिश्रण स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.
द्राक्षाचा स्क्वॅश
Category:
खाद्ययात्राद्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची देठे काढून टाका. त्याचा रस काढा. गाळून ठेवा. पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन उकळा. उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अॅसिड घालून मिश्रण खाली करा. स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.
कोकोनट मिंट कूल
Category:
खाद्ययात्राशहाळ्यातील पाणी काढा. बर्फ न टाकता सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून भांड्यात मिश्रण ओतून थंड करण्यास ठेवा किंवा ग्लासात बर्फ टाकून त्यात तयार सरबत ओता आणि प्यायला द्या.
बोरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ
Category:
खाद्ययात्रासर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे.
कोकोनट मिल्की कूल
Category:
खाद्ययात्रानारळाचे दाटसर दूध फ्रिजमध्ये ठैवून थंड करुन घ्या. या दुधात अननसाच्या फोडी सोडून सर्व पदार्थ घालून चांगले मिसळून घ्या. तयार सरबत ग्लासात ओतून वरुन त्यात अननसाच्या थोड्या थोड्या फोडी घाला. आणि प्या.