भंडारा जिल्ह्याचा इतिहास
Category:
शहरे आणि गावेपितळी भांड्यांचे शहर म्हणून भंडारा शहराची व जिल्ह्याच्या नावाची व्युत्पत्ती मांडली जाते. ‘भाणारा’ शब्दापासून ‘भंडारा’ हे नाव पडले असेही म्हटले जाते. या भागात १२ व्या शतकातील एका शिलालेखात भंडारा शहराचा भाणारा असा उल्लेख आढळतो. ‘भाण’ हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात असावा, असे अनुमान निघते.