कोण ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात?
Category:
लेखसंग्रहध्वनी प्रदूषण हा जागतिक पातळीवरचा प्रश्न असून तो गंभीर बनत चालला आहे. सर्वच प्रकारची गर्दी असणाऱ्या मोठ्या महानगरांमध्ये या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. सतत मोठा आवाज कानावर आदळत असेल तर माणसाला बहिरेपणा किंवा बधीरपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे हृदयरोग, ब्लडप्रेशर, अल्सर, कोलेस्टेरॉल, श्वसन आणि पचनाचे विकारही जडतात.