अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – पिंपात मेले ओल्या उंदिर

Category:

 

मर्ढेकरांची पिंपात मेले ओल्या उंदिर कविता – दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ

  March 24, 2011


अवर्गिकृत

वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

Category:

 

लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे ‘मराठीच्या पिंडावरील कावळे’ हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का ‘फुल्या-फुल्या’ मारून वेळ मारून न्यावी?

  March 23, 2011


अवर्गिकृत

धोबी घाट`- बाहेरच्यांची मुंबई

Category:

 

`धोबी घाट`बद्दल त्याच्या प्रदर्शनापासून एक संभ्रमाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. खरं तर तसं असण्याला कारण नाही. हा चित्रपट वेगळा आहे, असणार, हे आपल्याला अपेक्षित तर होतंच. त्याच्या पूर्वप्रसिद्धीपासून ते `धोबी घाट` या वरकरणी चमत्कारिक नावापर्यंत सर्वच बाबतीत त्याचा हा वेगळेपणा अधोरेखित कऱण्यात येत होता.

  March 23, 2011


अवर्गिकृत

हो ते भारतीयच आहेत.. पण आपणच ते विसरतो…

Category:

 

काल-परवाच एक बातमी वाचली होती.. अरूणाचल प्रदेशात रामदेवबाबांनी अरूणाचलमध्ये त्यांचं योग शिबीयेभरविले

होते.. योगाभ्यास घेताना मध्ये मध्ये ते वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते… त्यावेळी त्यांनी देशात बोकाळलेला

भ्रष्टाचार आणि कॉंग्रेस याबाबात बोलाण्यास सुरूवात केली.. त्यावेळी तिथे कॉंग्रेसचेच अरूणाचलल मधुन निवडून

आलेले एक सदस्य उपस्थित होते.. ते चिडले.. आणि चक्क रामदेव बाबांना म्हणाले ”यु ब्लडी इंडियनस्” (????)

  March 23, 2011


अवर्गिकृत

कुटील अमेरिका व दोस्त राष्ट्रांचे स्वार्थी हल्ले

Category:

 

अमेरिकेला लोकशाही किवां तत्सम मानवीय मुल्यांवर फार मोठा विश्वास आहे, असे समजण्याचे कारण नाही.अमेरिकेची व तत्सम पाश्चात्य राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही अरब राष्ट्रांच्या तेलाच्या भरवश्यावर जीवंत आहे. आर्थिक मंदीच्या खाईतून बाहेर निघण्यासाठी अनावश्यक बाब पुढे करून तेल उत्पादक राष्ट्रांना वेठीस धरणे सुरु केले आहे.पर्यायाने जगातील इतरही राष्ट्रे बाधित होतीलच.

भारतीय उपखंडात तणाव तसेच शस्त्रास्त्र स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याचे महापातक अमेरिकेकडेच जाते. शस्त्र विक्रीच्या भरवश्यावर अमेरिकेची अर्धी अर्थव्यवस्था चालत असते,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

  March 22, 2011


लेखसंग्रह

बांधकाम क्षेत्रातील काळापैसा मुद्रांक शुल्कात कपात करून रोखता येणार नाही ! तर…

Category:

 

माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल.

  March 22, 2011


अवर्गिकृत

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचविलेली अ ची बाराखडी : आक्षेपांचे निरसन

Category:

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषाशुध्दीसंबंधी मूलभूत योगदान दिले आहे. त्याचे पुतणे श्री. विक्रम सावरकर यांचेशी फोनवर अनेक वेळा बोलतांना, बरेच मराठी शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविल्याचे कळले. महापौर, कलामंदीर (स्टुडियो), दिग्दर्शन, दिनांक वगैरे सुटसुटीत आिण चपखल मराठी शब्द सावरकरांचेच. परंतू त्यांनीच सुचविलेली अ ची बाराखडी मागे का राहिली? त्यासंबंधी काही विचार….

  March 22, 2011


लेखसंग्रह

स्वतः जळून उब देता आली पाहिजे !

Category:

 

आपण निस्वार्थी प्रेम करून, जर इतरांच्या जीवनात थोडासाही आनंद निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनात आनंदाचे लक्ष लक्ष क्षण येतील.

काडीकचऱ्यात सडून नष्ट होण्यापेक्षा स्वतः जळून दुसऱ्यांना उब देता आली पाहिजे.

  March 22, 2011


अवर्गिकृत

महासत्तेची पावले…

Category:

 

आपल्या देशाने महासत्ता व्हाव ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील इच्छा आहे. २०२० पर्यंत इंडिया महासत्ता होईलच. पण भारत महासत्ता होईल का? एकीकडे झपाट्याने बदलणारा इंडियाचा कार्पोरेट चेहरा तर दुसरीकडे ‘जैसे थे’ स्थितीतील ग्रामीण भारत; याला महासत्ता म्हणता येईल का? अनेक खेडी ही समस्यांच्या अंधारात चाचपडत आहेत. अस्वछ्चता, स्थानिक राजकारण, नेतृत्वाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबतची उदासीनता, सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, अनिष्ठ चालीतीती या असंख्य अडचणींचा विळखा सुधारणा होऊ देत नाही. खेड्यातील तरुण व सुशिक्षित नागरिक एकत्र आले तर ही स्थिती बदलू शकेन.

  March 21, 2011


अवर्गिकृत

ब्रेक – अप

Category:

 

ब्रेक – अप

प्रेमात ब्रेक – अप आमच्या वाट्याला कधी आलाच नाही …..

ब्रेक – अप होण्याइतक प्रेम कधी कोणावर केलच नाही ……

  March 21, 2011